आंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरींना एक लाखाची लाच घेताना पकडले

आंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरींना एक लाखाची लाच घेताना पकडले

घोडेगाव ः आंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी व लिपिक दिनकर लाडके यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. 
दरम्यान, तहसीलदार पैकेकरी यांनी घोडेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात कारवाई करून डबर वाहतूक करणारा ट्रक आणून ठेवला होता. तहसीलदार पैकेकरी यांनी डबर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर 2 लाख 41 हजार 50 रुपये दंड आकारणार असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. 

त्यावर तक्रारदार यांना तहसीलदार पैकेकरी यांनी 1 लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी 6 वाजता तहसील कार्यालयामध्ये 50 हजार रुपयांची लाच घेताना वरील दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांवर रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com