अजित पवारांना क्‍लिनचिट दिल्याने भाजप तोंडघाशी !

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने सिंचन घोटाळयाची हवाच निघाली असल्याचे सांगितले जाते.
Devendra_Fadanvis Ajit Pawar
Devendra_Fadanvis Ajit Pawar

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळयासंदर्भात क्‍लिनचिट मिळाल्यामुळे भारतीय जनता पक्ष तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


सिंचन घोटाळयाचे भुत अजित पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्या मानगुटीवर मागील पाच वर्षांपासून बसले होते. त्यामुळे पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बदनामी करत राजकीय फायदा उठवण्याची संधी मागील पाच वर्षांत भाजपने सोडली नव्हती. 


लोकसभा, विधानसभा यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने सिंचन घोटाळयाचा मुददा उपस्थित करीत त्याचे राजकीय भांडवल केल्याचे स्पष्ट झाले होते. पवार यांना लवकरच जेलमध्ये टाकू, अशा वल्गना भाजपचे नेते वारंवार करीत होते. त्यामुळे अजित पवार यांच्या डोक्‍यावर सिंचन घोटाळयाची मागील पाच वर्षांपासून टांगती तलवार होती.


 या घोटयाळयाच्या आरोपामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तसेच पक्षाची बदनामी होत होती. याची पक्षाला किंम्मत मोजावी लागल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगतात.2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने सिंचन घोटाळा हा प्रचाराचा मुददा करून राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला केल होता. 


त्यामुळे भाजप सत्तेवर आल्यावर पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार याची अटकळ बांधली जात होती. मात्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याने सिंचन घोटाळयाची हवाच निघाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com