सिंचन गैरव्यवहारात नव्याने सात गुन्हे दाखल

...
सिंचन गैरव्यवहारात नव्याने सात गुन्हे दाखल

नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यासह, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता अशा अकरा अधिकाऱ्यांवर सात नवे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विदर्भातील सिंचन प्रकल्पांत झालेल्या गैरप्रकारची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका जनमंचने उच्च न्यायालयात सादर केली. विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकांवर अंतिम सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच, हे शपथपत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले.

सदर घोटाळा हा केवळ प्रशासकीय हयगय या स्वरूपातील असून या सिंचन घोटाळ्याची यापूर्वी चौकशी केलेल्या वडनेरे, वांढरे अथवा माधवराव चितळे समितीने अजित पवार यांना या घोटाळ्यासाठी जबाबदार धरले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी केवळ विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे सचिव, अवर सचिव यांच्यावरच आहे.

त्याशिवाय राज्य सरकारच्या रूल्स ऑफ बिझनेसमध्ये संबंधित खात्याच्या सचिवांनी कोणताही निर्णय घेण्यासाठी संबंधित मंत्र्यांना माहिती देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी जलसंपदा खात्याच्या सचिवांवर आहे, असे एसीबीने शपथपत्रात ठळकपणे नमूद केले होते.

एसीबीच्या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास करुन मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेत कार्यकारी अभियंता श्रीपाद मधुकर आपटे, विभागीय लेखाधिकारी सी.टी. जिभकाटे, अधीक्षक अभियंता डी.डी. पोहेकर, मुख्य अभियंता सोपान रा. सुर्यवंशी, कार्यकारी संचालक देवेंद्र परशुराम शिर्के, आसोलामेंढा कालव्यात गुरूदास मांडवकर, संजय लक्ष्मण खोलापूरकर, सोपान सुर्यवंशी, देवेंद्र शिर्के, नेरला (पाधोरा) उपसा सिंचन प्रकल्पात कार्यकारी अभियंता प्रभाकर विठ्ठल मोरघडे, विभागीय लेखा अधिकारी राम पुरूषोत्तम वाईकर, दिलीप पोहेकर, देवेंद्र शिर्के, रोहिदास लांडगे, सोपान सुर्यवंशी, गोसीखुर्द डावा व कालव्यात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वसंत ग्यानदेव गोन्नाडे, विभागीय लेखाधिकारी अरूण खेमलाल कोकुडे, सोपान सुर्यवंशी, घोडाझरी शाखा व उजव्या मुख्य कालव्यातील गैरप्रकारात गुरुदास सहदेवराव मांडवकर, देवेंद्र शिर्के, सोपान सुर्यवंशी, संजय खोलापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक व प्रभारी तपास अधिकारी राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात समन्वय अधिकारी मिलींद तोतरे, रविंद्र राऊळ, उपअधीक्षक प्रमोद चौधरी, दिनेश लबडे, प्रफुल्ल गीते, भावना धुमाळे व पोलिस निरीक्षकांनी पार पाडली.

अमरावती रेंज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी सिंचन घोटाळ्यात एकाच दिवशी सात गुन्हे दाखल केले आहेत.
प्रकल्पांची नावे .

१) उमा बॅरेज अकोला जिल्ला 
२) पूर्ण बॅरेज अकोला जिल्ला 
३) हिरडावं बुलढाणा जिल्ला.
४) भागडी अमरावती जिल्ला.
५) दगड पर्वा अकोला जिल्ला 
६) पेंटाकळी बुलढाणा जिल्ला 
७) महागाव यवतमाळ जिल्ला .

अमरावती रेंज लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये दाखल गुन्ह्यांची संख्या आता ११ झाली आहे.!!!

या अगोदर दाखल केलेले गुन्हे

१) जिगाव बुलढाणा जिल्हा.
२) वाघाडी अमरावती जिल्हा
३) रायगड अमरावती जिल्हा
४) निम्न पेंडी अमरावती जिल्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com