माजी खासदार अजय संचेती यांच्यावर सिंचन घोटाळाप्रकरणी नवा गुन्हा

...
ajay sancheti
ajay sancheti

पुणे : सिंचन घोटाळ्यात चौकशी सुरू असलेल्या हजारो प्रकरणांमधील आणखी सात प्रकरणांमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज नव्याने गुन्हे दाखल केले. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे माजी खासदार अजय संचेती यांचा समावेश आहे. संचेती संचालक असलेल्या एसएमएस इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीच्या इतर संचालकांसह डी. ठक्कर कन्स्ट्रक्‍शन कंपनी व तत्कालिन कार्यकारी अभियंता एम.टी. देशमुख व तत्कालिन लेखाधिकारी संजीवकुमार यांचा यात समावेश आहे,  अशी माहिती एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

विदर्भातील विविध सिंचन प्रकल्पातील घोटाळ्यांच्या आरोपानंतर या या प्रकल्पांची चौकशी सुरू झाली आहे. यातील अनेक प्रकरणे चौकशीत तथ्य आढळून न आल्याने चौकशी बंद करण्यात आली आहे. मात्र, ज्या प्रकरणात तथ्य आढळले अशा प्रकरणात गुन्हे दाखल होत आहेत.

सिंचन प्रकल्पातील काही कामे माजी खासदार संचेती संचालक असलेल्या एसएमएस इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीला मिळाली आहेत. मात्र, या प्रकरणात अर्थिक गैरव्यवहार झाल्याची व त्यातून राज्य सरकारची फसवणूक झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. माजी खासदार संचेती हे भाजपाचे राज्यसभेवरील खासदार होते. दोन वर्षापूर्वी त्यांची मुदत संपली आहे. ते नागपूरचे असून व्यवसाय-उद्योग क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळातील नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. पक्ष संघटनेतही त्यांचा दबदबा आहे. या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणात त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

जच्या गुन्ह्यासह अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पांचा समावेश आहे. यापूर्वी चार गुन्हे दाखल झाले असून अमरावतील विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 11 वर पोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com