अभाविपच्या प्रांत अधिवेशनात नागरिकत्व विधेयक, सावरकर राहणार का केंद्रस्थानी ?

.....
अभाविपच्या प्रांत अधिवेशनात नागरिकत्व विधेयक, सावरकर राहणार का केंद्रस्थानी ?

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलेले पूर्व कार्यकर्ते आणि केंद्रात व राज्यात गेल्या काही वर्षात सत्तेची विविध पदे भूषविलेले आणि भूषवित असलेले अनेकजण येत्या 28 ते 30 डिसेंबर दरम्यान पुण्यात एका व्यासपीठावर येणार आहेत. अभाविपच्या 54 व्या महाराष्ट्र प्रांताचे तीन दिवसीय अधिवेशन पुण्यात होणार असून नितीन गडकरी यांच्यापासून राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांच्यापर्यंत अनेकांची उपस्थिती या अधिवेशनाला राहणार आहे. सध्या चर्चेत असलेले नागरिकत्व दुरूस्ती विधेयक व स्वातंत्र्यवीर सावरकारांचा विषय या अधिवेशनाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्‍यता आहे. 

माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, व्ही. सतीश, खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह शंभरहून अधिक खासदार, आमदार, केंद्रातील मंत्री, माजी मंत्री तसेच भाजपाच्या संघटनेत काम करणारे अनेक नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अभाविपचे प्रदेश अधिवेशन बऱ्याच वर्षानंतर पुण्यात होत आहे. अभाविपचे पूर्वाश्रमीचे शेकडो कार्यकर्ते सध्या सत्तेत आहेत. किमान दीड हजारजण अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. सध्या चर्चेत असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय चर्चेत येण्याची शक्‍यता आहे. या विषयावरून देशभर सध्या चर्चा सुरू आहे. या निमित्ताने भाजपा विरूद्ध कॉंग्रेस अशी आंदोलने सुरू आहेत. त्यातच नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाची भर पडली आहे. या साऱ्यांचे पडसाद या अधिवेशनात पडणार आहेत. हे दोन्ही विषय यापूर्वी जेव्हा-जेव्हा चर्चेत आले. त्या-त्यावेळी विद्यार्थी परिषदेने ठोस भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्या या विषयावरील चर्चेच्या काळातच होणाऱ्या अधिवेशनात या विषयाचे पडसाद पडल्याशिवाय राहणार नाहीत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com