abvp and centeral government | Sarkarnama

आता "अभाविप'ही केंद्र सरकारच्या विरोधात लढाई पुकारणार

मंगेश गोमासे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

नागपूर : केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाकडून विविध मुद्यांवर घेरणे सुरू असताना संघ परिवारातील विद्यार्थी संघटना अभाविपनेही केंद्र सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन पुकारण्याची घोषणा नागपुरातून केली आहे. नागपुरातील संविधान चौकात अभाविपने केंद्र सरकारच्या विरोधात धरणे देऊन करून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. 

नागपूर : केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाकडून विविध मुद्यांवर घेरणे सुरू असताना संघ परिवारातील विद्यार्थी संघटना अभाविपनेही केंद्र सरकारच्या विरोधात देशभर आंदोलन पुकारण्याची घोषणा नागपुरातून केली आहे. नागपुरातील संविधान चौकात अभाविपने केंद्र सरकारच्या विरोधात धरणे देऊन करून देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. 

गेल्या काही वर्षांपासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल केल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्याने नाराजी पसरली आहे. या विरोधात डाव्या व कॉंग्रेसपक्षाचे समर्थन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली आहेत. आता संघ परिवारातील अभाविपने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 

अभाविपचे विदर्भ प्रात मंत्री विक्रमजीत कलाने यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विद्यार्थ्यांच्या संबंधित इतर मागण्यांही यावेळी करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे इतर प्रश्न येत्या 15 दिवसात मार्गी न लावल्यास राष्ट्रीय पातळीवर आंदोलन उभारण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. या आंदोलनात पूर्व विदर्भातील नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीतील दोनशेपक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. 

अभाविपचे विदर्भ प्रांतमंत्री विक्रमजीत कलाने म्हणाले, सरकार कोणतेही असो, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नासाठी अभाविप नेहमीच आंदोलन करीत आली आहे. सरकार कोणत्या पक्षाचे आहे , हे महत्त्वाचे नाही. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हीच अभाविपची प्राथमिकता राहिली आहे. या धोरणानुसारच हे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात नाही तर विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी असल्याचे कलाने यांनी "सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख