In absence of opposition there is calmness in assembly | Sarkarnama

विधीमंडळात विरोधक नसल्याने सर्वत्र शुकशुकाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

 

मुंबई : विरोधीपक्षाच्या १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी विरोधीपक्षानी मागील आठवड्यापासून असलेला कामकाजावरील बहिष्कार बुधवारीही कायम होता, तसेच बरेच आमदार संघर्ष यात्रेसाठी गेले आहेत. त्यामुळे विधानभवन परिसरात विरोधक नसल्याचे चित्र आहे. परिणामी शुकशुकाटाचे वातावरण आहे.

 

मुंबई : विरोधीपक्षाच्या १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी विरोधीपक्षानी मागील आठवड्यापासून असलेला कामकाजावरील बहिष्कार बुधवारीही कायम होता, तसेच बरेच आमदार संघर्ष यात्रेसाठी गेले आहेत. त्यामुळे विधानभवन परिसरात विरोधक नसल्याचे चित्र आहे. परिणामी शुकशुकाटाचे वातावरण आहे.

या वातावरणातच सताधारी पक्षाने सकाळी विरोधकांच्या गैरहजेरीतच विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास रेटून नेला. विरोधीपक्ष सदस्यांचे तारांकित प्रश्न पुकारण्यात आले मात्र सभागृहात ते उपस्थित नसल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नाही. तर प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी लक्षवेधी सूचना पुकारली मात्र पहिल्या दोन लक्षवेधी सूचना या विरोधी पक्ष सदस्यांच्या असल्याने त्या पुढे ढकलाव्या लागल्या.

कपिल पाटील आता विधानपरिषदेत जनता दलाचे प्रतिधित्व करणार

मुंबई : कपिल पाटील यांच्या लोक्भारति पक्षाचे नितीश कुमार यांच्या  युनायटेड जनता दल पक्षामधे  विलीनीकरण. विधान परिषदेत यापुढे कपिल पाटील  हे नितीन कुमार यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणुन बसणार. विधान परिषदचे सभापती रामराजे निंबाळकर यानी दिली मान्यता.

विरोधकांच्या संघर्ष यात्रेचे विधान परिषदेत पडसाद

मुंबई :  भाजप सरकार विरोधात आजपासून विरोधी पक्षानि सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचे पडसाद बुधवारी विधान परिषदेत उमटले .  

             विधानपरिषद विशेष सभा 10.00 वाजता  सुरु झाली तेव्हा विरोधकानी गोंधळ घातला. राज्यात संघर्ष यात्रा सुरु होणार असताना आम्ही सभागृहात चालू ठेवणे योग्य नाही असे कोंग्रेसचे गटनेते शरद रनपिसे यांनी परिषदेत सांगितले. त्यानंतर  विरोधकांच्या घोषनेनंतर सभागृहाचे कामकाज तह्कुब करण्यात आले.
  पुन्हा विशेष बैठकीत लक्षवेधी सुचना होणार होत्या. परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यानि  सभागृह मधे न होता विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकार विरोधी जोरदार घोषणा बाजी केली.    होश मे आव होश मे आव,फडणविस सरकार होश मे आव. मंत्रालयात् शेतकऱ्याला मारहाण करनाऱ्या सरकारचा धिक्कार असो. जोर जुलूम के संघर्ष मे संघर्ष हमारा नारा हैं अशा घोषणा देण्यात आल्या.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख