absconding Swami Nityanand established independent country | Sarkarnama

फरार स्वामी नित्यानंदने स्थापन केला स्वतंत्र देश

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंद स्वामी कुठं आहे, याचं कोडं फक्त पोलिसांना नाही, तर संपूर्ण भारताला पडलं आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेला नित्यानंद स्वामी देश सोडून फरार झाल्याची माहिती मिळाली होती. आता त्यानं स्वतःचा एक देशच स्थापन केल्याची माहिती पुढं आलीय. लॅटिन अमेरिकेजवळ, एक बेट विकत घेऊन त्यानं कैलासा नावाचा देशच स्थापन केल्याचं बोललं जातंय.

काय आहे कैलासा देश?

'कैलासा' देशाची kailaasa.org वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. त्या वेबसाईटवरील माहितीनुसार 'इंडिया टुडे'नं एक बातमी प्रसिद्ध केलीय. या वृत्तात म्हटले आहे की, कैलासा हा असा देश आहे की, ज्याला कोणत्याही सीमा नाहीत. ज्या हिंदू धर्मियांचे त्यांच्यात देशात हिंदू धर्माचं पालन करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांना या बेटावर अर्थात कैलासा देशात प्रवेश देण्यात येणार आहे.

या वेबसाईटसोबतच nithyanandapedia.org ही सुरू करण्यात आले आहे. हे विकीपिडियासारखेच असून, नित्यांनंदापीडिया म्हणजे, भगवान श्री नित्यानंद परमेश्वरम यांचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्टच्या माध्यमातून हे ज्ञान देण्यात येईल, असे वेबसाईटवर म्हटले आहे. कैलासा देशाचे निश्चित लोकेशन हे अद्याप गूढ असले तरी, नित्यानंद स्वामीने लॅटिन अमेरिकेतील इक्वेडोर या देशाकडून हे बेट विकतच घेतल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नित्यानंद स्वामीने नेपाळ मार्गे इक्वेडोरला पलायन केले होते. केलासा देशाची अधिकृत भाषा ही इंग्रजी, संस्कृत आणि तमीळ आहे. देशाची लोकसंख्या दहा लाख कोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातील 2 कोटी लोक हे हिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे. कैलासा देशाचे राष्ट्रीय फूल कमळ असून, तर राष्ट्रीय प्राणी नंदी आहे.

कोण आहे नित्यानंद?
स्वामी नित्यानंदवर कर्नाटकमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्या खटल्यांची सुनावणीही सुरू आहे. यात अपहरण, लैंगिक शोषण यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच गुजरातमध्येही अहमदाबादमधील त्याच्या आश्रमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख