बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्त्याचा मृतदेह पुण्याजवळ सापडला

बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसट यांचा मित्रानीच खून करुन टाकलेला मृतदेह लवासा जवळील मुठा गावाजवळ दरीमध्ये मंगळवारी पहाटे आढळून आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ गांभीर्याने तपास न केल्यामुळे विनायकला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्त्याचा मृतदेह पुण्याजवळ सापडला

पुणे : बेकायदा बांधकामाविरुद्ध आवाज उठविणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसट यांचा मित्रानीच खून करुन टाकलेला मृतदेह लवासा जवळील मुठा गावाजवलील दरीमध्ये मंगळवारी पहाटे आढळून आला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ गांभीर्याने तपास न केल्यामुळे विनायकला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

विनायक शिरसट हे 30 जानेवारीला बेपत्ता झाले होते, त्यांनंतर विनायकचे वडील व भाऊ भारती विद्यापीठ पोलिस ठान्यात फिर्याद देण्यासाठी गेले होते. विनायक हे माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन अनधिकृत बांधकाम करणाऱ्याविरुद्ध आवाज उठवित होते, त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिकांनीच त्यांचे अपहरण केल्याबाबतची फिर्याद शिरसट कुटुंबियांना द्यायची होती. प्रत्यक्षात पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतरही शिरसट यांचा तपास करण्यासाठी भारती विद्यापीठ  पोलिसांकडे सतत पाठपुरावा केला, मात्र पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही.

मग सुत्रे हलली
अखेर या कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडुन होणारे दुर्लक्षाबाबत पोलिस आयुक्तलयासमोर आंदोलन करन्याचा इशारा दिला. दरम्यान, सोमवारी शिरसट कुटुंबीय व रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडीतर्फे पुलिस आयुक्तलयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय व युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांची भेट घेतली. वेंकटेशम यांनी हा तपास गुन्हे शाखा करेल, असे आश्वासन दिले. त्यानंतर एका रात्रीत पोलिस दल हलले आणि शिरसट यांचा मृतदेह सापडला.

रामदास आठवले यांच्या फोननंतर अपहरणाचा गुन्हा दाखल
शिरसट हे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी होते. त्यांच्या तपासाबाबत पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मिळाली. आठवले यांनी स्वत: पोलिस अधिकार्याना फोन करुन अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास करण्यास सांगितले. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा  आरोप शैलेन्द्र चव्हाण यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com