पिंपरीचे आमदार बनसोडे अखेर सापडले; विधीमंडळात शपथविधीला अवतीर्ण झाले

पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे हे अखेर आज विधीमंडतळातच शपथविधीसाठी अवतीर्ण झाले. त्यातून त्यांचे प्रथमच सार्वजनिक दर्शन झाले. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत सहभागी झाल्याने बनसोडेंनी जय हिंद,जय महाराष्ट्र, असा नारा शपथविधीनंतर दिला
Ajit Pawar Loyalist Anna Bansode Took oath
Ajit Pawar Loyalist Anna Bansode Took oath

पिंपरी : राज्यातील राजकीय भूकंपात गेल्या काही दिवसांपासून शोध न लागलेले पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे हे अखेर आज विधीमंडतळातच शपथविधीसाठी अवतीर्ण झाले. त्यातून त्यांचे प्रथमच सार्वजनिक दर्शन झाले. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत सहभागी झाल्याने बनसोडेंनी जय हिंद,जय महाराष्ट्र, असा  नारा शपथविधीनंतर दिला. तर,भाजपच्या अनेक आमदारांनी जय श्रीरामचा घोष केला.

दरम्यान, शपथविधीसाठी पूर्ण नाव घेताना नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडून आलेले शरद पवार यांचे नातू रोहित यांनी आपल्या नावानंतर आई सुनंदा व त्यानंतर वडील राजेंद्र यांचे नाव घेतले. तोपर्यंत शपथविधी झालेल्या एकाही आमदाराने आपल्या मातोश्रींचे नाव वडिलांबरोबर न घेतल्याने त्यांचा शपथविधी चर्चेचा विषय ठरला.

बनसोडेंनी शपथ घेतल्यानंतर जय राष्ट्रवादी अशी पक्षाची घोषणा दिली नाही. तर, जय हिंद,जय महाराष्ट्र असा शिवसेना थाटाचा नारा दिला. तो कित्ता पक्षाचे पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनीही गिरवला. पिंपरी-चिंचवडला तीन आमदार आहेत. त्यातील दोन आमदार (चिंचवडचे लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे) भाजपचे,तर एक (पिंपरीचे बनसोडे) राष्ट्रवादीचा आहे. त्यातील बनसोडे यांची आमदारकीची शपथ सकाळी दहा वाजता झाली. त्यानंतर पंधरा मिनिटांनी लांडगेंनी ती घेतली.

अजित पवार यांच्या बंडानंतर बनसोडे हे राज्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार अजितदादांबरोबर शेवटपर्यंत राहिले होते.मात्र, त्यांचा शोध आजपर्यंत लागलेला नव्हता. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे ते नक्की कोठे आहेत, हे कळू शकले नव्हते. त्यामुळे सस्पेन्स वाढला होता. तो आज सकाळी संपला. पिंपरीकरांनीच नाही, तर सर्व राज्याने त्यांना थेट शपथ घेताना काही दिवसानंतर पहिल्यांदाच विधीमंडळात पाहिले. पिंपरी-चिंचवडमधील एका उद्योजक राजकारण्याच्या मुंबईतील बंगल्यात ते आजपर्यंत होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com