गोव्यात गायब झालेला नाशिकचा नगरसेवक मुंबईत सापडला भाजप पदाधिकाऱ्यांच्या तावडीत

भाजपचे 48 नगरसेवक गोव्यात एका समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलवर तीन दिवस मुक्कामी होते. या नगरसेवकांच्या कानावर फाटाफुटीच्या बातम्या येऊ नये याची विशेष काळजी घेतली जात होती.एव्हढी खबरदारी असतांना सिडकोतील त्रिमुर्ती चौकातील एक नगरसेवक कॅसीनो बघायला जातो असे सांगून सायंकाळी तेथून बाहेर गेले.
BJP Corporators Returned Back From Goa For Mayor Election
BJP Corporators Returned Back From Goa For Mayor Election

नाशिक : महापौर निवडणुकीला अवघा चोविस तासांचा अवधी शिल्लक आहे. हा वेळ जसा जसा कमी होत आहे, तसतशी भाजपला अधिक सावधगिरी बाळगावी लागत आहे. काल रात्री भाजपचा एक नगरसेवक गोव्याच्या कॅम्पमधून सटकला. त्यामुळे सगळ्या भाजपच्या नेत्यांची अक्षरशः झोप उडाली. या नगरसेवकाला आज सकाळी मुंबई विमानतळावर मुंबईतील भाजपच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडल्याचे कळते.

याबाबत माहिती अशी की, भाजपचे 48 नगरसेवक गोव्यात एका समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलवर तीन दिवस मुक्कामी होते. या नगरसेवकांच्या कानावर फाटाफुटीच्या बातम्या येऊ नये याची विशेष काळजी घेतली जात होती. अनेकांनी तेथील फोटो, व्हीडीओ सोशल मिडीयावर व व्हाटसअॅपवर अपलोड केल्याने काहींचे मोबाईल देखील काढून घेतले होते. एव्हढी खबरदारी असतांना सिडकोतील त्रिमुर्ती चौकातील एक नगरसेवक कॅसीनो बघायला जातो असे सांगून सायंकाळी तेथून बाहेर गेले. 

त्यानंतर ते परत आलेच नाही. रात्रभर त्यांचा शोध घेऊनही ते सापडलेच नाही. त्यामुळे नेते घामाघुम झाले. त्यांना रात्रभर झोप लागली नाही. यासंदर्भात नाशिक येथील एका कामगार नेता तसेच मुंबईतील शिवसेनेतून एका भाजपमध्ये आलेल्या आणि मुंबई विमानतळावर रोजंदारी कामगारांची संघटना असलेल्या नेत्याला कळविण्यात आले. सकाळी नऊच्या विमानाने हे नगरसेवक मुंबईला उतरताच भाजपचे नेते तेथे टेहेळणी करीत होते. त्यांनी या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. मात्र, या नाट्याने नगरसेवकांत त्याची चांगलीच चर्चा होती.

आज दुपारी तीन विमानांमध्ये नगरसेवकांचे बुकींग होते. दुपारी एक, दीड आणि दोन वाजताच्या विमानाने ठ्ठेचाळीस नगरसेवकांना मुंबईला व तेथून नाशिकला रवाना करण्यात आले. हे नगरसेवक मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांचाही बंदोबस्त होता. भाजपमध्ये असलेल्या नेत्याच्या संघटनेचा एक कर्मचारी एका नगरसेवकांसाठी नियुक्त केला होता. तो नगरसेवकांवर लक्ष ठेऊन होता. नगरसेवकांच्या बॅगा त्यांच्या ताब्यात देऊन या कर्मचाऱ्यांनी त्यांना थेट बसमध्ये बसवले. ही बस रवाना होईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवले जात होते. एव्हढे करुनही यात नाराज नगरसेवक आहेतच. त्यांचे काय होते हे उद्याच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com