पंकजा मुंडेंविषयीचे संजय काकडेंचे ते मत वैयक्तिक : माधुरी मिसाळ 

sanjay kakade and madhuri misal
sanjay kakade and madhuri misal

पुणे : भारतीय जनता पार्टीचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबाबत व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे मत पक्षाच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी आज व्यक्त केले. 

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान झाला आहे, अशी भावना खासदार काकडे यांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना शहराध्यक्ष मिसाळ यांनी वरील प्रतिक्रिया दिली. 

मिसाळ म्हणाल्या, "" भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसात पक्षाबाहेरच्या व्यक्ती पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर दौरा करणार असल्याची बातम्या आल्या आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करण्यात गैर काय असा प्रश्‍न करून आपण स्वत: सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करीत आहोत.'' 

पंकजा मुंडे यांनी परळीत गोपीनाथ गडावर बोलताना भाजपाच्या नेत्यांवर विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्यावरून आज राज्यभर चर्चा आणि प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सहयोगी खासदार काकडे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर शहराध्यक्ष या नात्याने मिसाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र आहेत. मात्र, पक्षाबाहेरील काही शक्ती पक्षात फूट पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com