माझ्या खात्याबाबत साहेबच निर्णय घेतील, काही माझ्या हातात नाही : अजित पवार 

माझ्या खात्याबाबत साहेबच निर्णय घेतील, काही माझ्या हातात नाही : अजित पवार 

पुणे : ""माझ्या खात्याबाबत साहेबच निर्णय घेतील, काही माझ्या हातात नाही,'' असे स्पष्ट करतानाच शेतकऱ्यांबाबत लवकरच गोड बातमी मिळेल अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नागपुरात माध्यमांना दिली. 

नागपुरा उद्यापासून हिवाळी अधिवेशनास सुरवात होणार आहे. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधकांचे हल्ले कसे परतवून लावतात याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. अधिवेशन ठाकरेंसाठी नवे आहे. विरोधकांकडे जसे तयारीचे नेते आहेत तसेच सत्ताधारीकडेही आहेत. त्यामुळे अधिवेशनात कोण कोणाला चित्तपट करते हे पहावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा हे आजही मंत्री बनले नाहीत. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चाही सुरू आहे. 

शेतकरी कर्जमाफी, खातेवाटत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेली टीका आदी मुद्दे अधिवेशनात गाजणार आहेत. या सर्व घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर अजितदादा यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता नेहमी प्रमाणेच आपली रोखठोक मते मांडली. 

ते म्हणाले, की मला मंत्री करायचे की नाही, कोणते खाते द्यायचे याचा निर्णय साहेब घेतील. राज्याची आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून कर्जमाफी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम करीत आहे. लवकरच तशी गोड बातमी शेतकऱ्यांना मिळेल अशी माझी माहिती आहे. शेवटी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करताना सर्व आर्थिक भार राज्यालाच उचलावा लागतो

त्याचा केंद्राशी काही संबंध येत नाही. किती बोजा राज्य सहन करते याचा अभ्यास सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर अधिक भाष्य न करता सर्वांनी संयमाची भूमिका घेण्याची गरज असल्याचेही अजितदादांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com