काय सांगता? पुणे, मुंबईतून ६८०० जण जावळीत दाखल!

शहरातून थवेच्या थवे आला ग्रामीण भागाकडे परतू लागले आहेत.
corona pune
corona pune

कुडाळ (ता. जावळी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जावळी तालुक्‍यातील कुडाळ, भणंग व बामणोली याठिकाणी विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यातून सुमारे 6800 जण जावळी तालुक्यात दाखल झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर व तहसीलदार शरद पाटील यांनी दिली.

डॉ. वेलकर व श्री. पाटील म्हणाले, जावळी तालुक्‍यातील सर्व किराणा दुकाने, दूध, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, धान्य दुकान, सर्व स्वस्त धान्य दुकाने, फळे, भाजीपाला मार्केट हे सर्व जीवनावश्‍यक वस्तू विक्री सुरू आहे. अन्नधान्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे.

तालुक्‍याबाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आता तालुक्‍यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आली आहे. अशा व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. कुडाळ, वालूथ, दापवडी, हुमगाव, खर्शी बारामुरे, हातगेघर या सहा उपकेंद्रांतर्गत मुंबई, पुण्यातून सुमारे 6800 जण दाखल झाले आहेत. त्यांची कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदी झाल्या असून, त्यांच्या आरोग्य विभागाकडे तपासण्या सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी, उपकेंद्रात व प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज शेकडो जणांची तपासणी चालू आहे. त्याचबरोबर मुंबई व पुण्यासारख्या मोठ्या शहरातून गावाकडे आलेल्यांच्या तपासणीवर आरोग्य विभाग विशेष लक्ष ठेवून आहे. कुडाळ, भणंग, बामणोलीत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्‍यात आरोग्य विभाग सज्ज असून, जमावबंदी व बंदचा चांगला फायदा झाल्याने कुडाळ विभागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत वेलकर यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com