याद राखा, देश कोणाच्या गढी- वाड्यावरुन चालत नाही : अभिमन्यु पवार

हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो तो कोणाच्या वाड्यावरुन किंवा गढीवरुन चालत नाही. जर कोणत्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले तर त्यांनी रितसर पोलिसांकडे तक्रार नोंदवा पुढचे मी आणि पोलिस बघुन घेतो. -अभिमन्यु पवार
abhimayu pawar
abhimayu pawar

औसा :  "कोणी देशमुख असतील कोणी पाटील असतील त्यांनी आमचे भाषण आपल्या कानात साठवुन ठेवावे, यापुढे जर कार्यकर्त्यांना धमकावाल तर याद राखा. आमच्या नादाला लागु नका. आम्हीही कोणाच्या नादाला लागत नाही.  मात्र जर कोणी दमदाटी करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.

हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो तो कोणाच्या वाड्यावरुन किंवा गढीवरुन चालत नाही. जर कोणत्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले तर त्यांनी रितसर पोलिसांकडे तक्रार नोंदवा पुढचे मी आणि पोलिस बघुन घेतो", असा सज्जड दम  औशाचे नुतन आमदार अभिमन्यु पवार यांनी आपल्या पहील्याच भाषणात दिला आहे.


 ते शनिवारी (ता.26) तालुक्यातील लामजना गावात लोकांचे ऋण व्यक्त करण्याकरीता आयोजीत बैठकीत बोलत होते. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे सदस्य महेश पाटील, सुभाष जाधव, संतोष मुक्ता तसेच ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.


आमदार श्री. पवार यांनी सांगतीले की,  "मीही राजकरणी कार्यकर्ता आहे. माझ्या मार्गात अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या . पण माझंही आडनाव पवार आहे. या निवडणुकीत माझ्या बाजुने माझी "वानरसेना" होती . याच वानरसेनेने माझा विजय साकारला. गेल्या अनेक वर्षापासुन मतदार आमदारांचा सत्कार करण्यासाठी जात होते . मात्र मी ही परंपरा मोडीत काढत मला ज्यांनी विजयी केले त्यांचे आभार मानायला मी त्यांच्या दारात मी आलो आहे."

"आता कोणीही कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रय़त्न केला तर याद राखा . त्याची गय केली जाणार  नाही. आम्हाला कोणाच्या  नादाला लागयचे नाही मात्र कोणी आमच्या नादी लागले तर त्यांना चांगला धडा शिकवु .   लोकशाहीत देश कोणत्या  गढीवरुन किेवा वाड्यावरुन चालत नाही तर तो कायद्याने चालतो त्यामुळे धमकावण्याचा प्रयत्न झाला तर रितसर तक्रार नोंदवा पुढे काय करायचे ते मी आणि पोलिस पाहून घेतो ,"असा विश्नासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

"निवडून येण्यापूर्वीच  मी या मतदारसंघातील विकासकामासाठी तीनशे कोटीहून आधिक निधी आणला. आनेक गावातील लोकांची प्रश्ने मंत्रालय व प्रशासनस्तारावर निकाली काढली. त्यामुळे निवडुन येण्याअगोदरच कामे करणारा महाराष्ट्रातील मी एकमेव आमदार आहे ," उच्चारही त्यांनी यावेळी केला. 


शिंदाळा ता. औसा येथे संपादीत जमीनीवर साठ मेगावॅट क्षमतेचा दोनशे विस कोटी रुपयांचा उर्जा प्रकल्प आलाय आणि तो मी आननारच असल्याने आजपर्यंत ज्या उर्जा प्रकल्पाचा केवळ राजकारणासाठी उपयोग केला गेला तो प्रकल्प मी आणनार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. 

"शिंदाळा उर्जा प्रकल्प हा तर नुसता ट्रेलर आहे..अजुन पिक्चर बाकी आहे. औसा मतदारसंघाच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट तयार आहे. मी मुंबईला गेल्यावर मुख्यमंत्र्याशी भेटुन येथील विकासकामा बाबत चर्चा करणार आहे. त्यामुळे औसा तालुक्याने खऱ्या अर्थाने कात टाकल्याची प्रचिती औसेकरांना येणार आहे. प्रथम शेतरस्ते, पानंदरस्ते व गावोगावच्या स्मशानभुमीचा प्रश्न येत्या  दोन वर्षात निकाली काढला जाईल.येत्या  काळात काम करतांना मी आडनाव पाहून काम करनार नाही तर त्याची गरज पाहून काम करेन, कामासाठी तुम्ही आधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही तर अधिकारी तुमच्याकडे येतील असे व्यवस्थापण आपण निर्माण करु,"शी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com