मुख्यमंत्र्यांचे राईट हॅन्ड अभिमन्यू पवार म्हणतात, लोकांनी मला स्वीकारलंय 

Devendra Phadanavis Abhimanyu Pawar.
Devendra Phadanavis Abhimanyu Pawar.

मुख्यमंत्र्यांचे राईट हॅन्ड म्हणून ओळख असणारे त्याचप्रमाणे औसा शहराच्या विकासात महत्वाची भूमिका साकारणारे अभिमन्यू पवार यांची  संदिप काळे यांनी घेतलेली प्रश्नोत्तर स्वरूपात घेतलेली ही विशेष मुलाखत.

लोकांनी तुम्हाला मतदान का करावं ?

लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर औशाच्या विकासाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मी स्वतः यामध्ये लक्ष घालून मुख्यमंत्र्यांच्या तसेच इतर मंत्र्यांच्या सहकार्यामुळे औशाच्या विकासासाठी २७५ कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळेच येथील लोकांनी मला स्वीकारलं असून ते मला प्रचंड मतांनी निवडून देतील असा माझा विश्वास आहे.

देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करत असतानाचा काळ आणि आता प्रचार करत असतानाचा काळ यामध्ये काय फरक आहे ?

मला फारसा फरक जाणवत नाही, कारण मी आधी एक राजकीय कार्यकर्ता आहे त्यानंतर मी साहेबांबरोबर काम केलं. त्यांच्याबरोबर प्रशासकीय काम करत असताना मी राजकीय घडामोडींवरदेखील लक्ष दिलं आहे. फरक इतकाच आहे की, आधी लोकं माझ्याकडे काम घेऊन यायचे आणि आता मी त्यांच्याकडे मत मागायला जाणार.

कोणत्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे किंबहुना ती कामं झाली आहेत?

भूकंपग्रस्त क्षेत्र असल्यामुळे लातूर-उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यात जवळपास ८०-९० गावं आहेत. त्यांच्याकडे पुनर्वसनानंतर दुर्लक्ष झालं आहे. खरंतर या गावांचा विकास हे आमच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे. त्याचप्रमाणे किल्लारी पाणीपुरवठा योजना, खरोका पाणीपुरवठा योजना  यांसाठी लोणीकर साहेबांनी जवळपास ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून २३ वर्षापासूनच असणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवला आणि  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथील नगरपरिषद राष्ट्रवादीची असतानाही साहेबांनी  कोणता पक्षपातीपणा न करता एक मुख्यमंत्री या नात्याने जनतेची सेवा केली.

 औसा या शहरासाठी तुमच्या पुढील योजना काय असतील ?

मी लहान असताना औसा शहर जस होतं तसच आजही आहे. औसा शहर चांगल सुधरू शकतं. येथील किल्ल्यांचे  प्रश्न, काही गावांत स्मशानभूमी नाही त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून जाणवणारा पाण्याचा तुटवडा आणि रस्त्यांचा प्रश्न यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.  तसेच अनेक अविकसित गावांचा विकास करण्याचे काम आम्ही येत्या काळात करणार आहे.

भाजप आणि संघ यांचा तुम्हाला जुने कार्यकर्ते म्हणून या निवडणूकीत कसा फायदा होईल ?

परिवाराचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना असं वाटत की, आमचा कार्यकर्ता आमदार होणार आहे त्यामुळे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत पूर्ण शक्तीनिशी आहेत.

एकदा का माणूस पदावर गेला की त्याची निष्ठा संपते याकडे तुम्ही कसे पाहता ?


मी वेगळा आहे. मा. मुंडे साहेब, मा. देवेंद्र फडवणीस यांचा कार्यकर्ता असल्यामुळे मी यांचा आदर्श समोर काम करण्यावर विश्वास ठेवतो.


अशी कोणती कामे आहेत ज्यामुळे जनसामान्यात या सरकारची  ओळख निर्माण झाली आहे?

या सरकारने अशी बरीच कामे केलेली आहेत की ज्यामुळे लोकांचा  सरकारवर विश्वास आहे. सर्वप्रथम मराठा आरक्षण मिळवून दिलं, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, मुंबई डेव्हलपमेंट तसेच  समृद्धी एक्सप्रेस वे इ. महत्वाची कामे त्याचप्रमाणे ज्यांच्या घरात गॅस नव्हता त्यांना गॅस मिळाला, घर नव्हतं त्यांना घर मिळालं अशा अनेक मूलभूत सुविधा पुरवण्याचा काम या सरकारने केलं आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारं हे सरकार आहे. म्हणूनच लोकसभेला ३०३ चा आकडा एकदा पार केला आणि युतीच्या राज्यात  २२०-२३० असे आकडे तुम्हा पत्रकारांना पाहायला मिळतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com