आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने निराधार महिलेला न्याय...

...............
आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने निराधार महिलेला न्याय...

बेलकुंड : शासकीय सेवेत असलेल्या पतीच्या निधनानंतर शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत घेण्यासाठी सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या माळकोंडजी (ता.औसा) येथील छकूबाई तानाजी कोळी यांना आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नामुळे आर्थिक मदत मिळाली. याबद्दल छकूबाई व वडील महादेव कोळी यांनी श्री.पवार यांची भेट घेत आभार मानले. 

माळकोंडजी येथील छकूबाई महादेव कोळी यांचा विवाह सहा वर्षापूर्वी उजनी येथील तानाजी कोळी यांच्याशी झाला. दरम्यान यवतमाळ येथे जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असताना आजाराने त्यांचे निधन झाले. यावेळी छकूबाई या वृद्ध सासूबरोबर राहत असत. यामध्ये पतीच्या निधनानंतर अवघ्या दोन महिन्यांत सासुबाईचे निधन झाले. विवाहाअगोदरच सासऱ्याचे निधन झाले होते. छकूबाई आपल्या मुलासोबत माळकोंडजी येथील वडील महादेव कोळी यांच्याकडे राहायला आल्या. 

शासकीय कार्यालयातून आर्थिक मदत मिळावी यासाठी गेल्या सहा वर्षांपासून आपल्या बाळाला घेऊन त्या यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना भेटून आपली कैफियत मांडायच्या. मात्र तुम्हाला शासकीय मदत मिळवून देऊ म्हणून प्रत्येक वेळी आश्वासन मिळायचे. यामुळे जाणवत असलेली आर्थिक चणचण व शासकीय कार्यालयातून छकूबाईला कसलीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मोलमजुरी करून छ्कूबाई आपला उदरनिर्वाह भागवत असत. 

अशातच छकूबाई व वडील महादेव कोळी यांनी आमदार पवार यांची भेट घेत आपली व्यथा आमदारांसमोर मांडली. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. पवार यांनी तातडीने यवतमाळ येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे सांगितले व संबंधित महिला ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला उदरनिर्वाह चालवत असून त्यांना शासकीय सेवेत लवकर सामावून घ्यावे सांगितले. यानंतर लगेचच छकूबाई कोळी यांच्या खात्यावर एक लाख रुपये जमा झाले असून काही महिन्यांत आणखी तीन ते चार लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन यवतमाळ प्रशासनाकडून देण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com