मुख्यमंत्र्याचे  PA अभिमन्यू पवार म्हणतात, मी कार्यकर्ता निलंगेकर माझे नेते

औसा विधानसभा मतदार संघातून पालकमंत्र्याचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यासह अनेकजण इच्छूक आहेत .
Nilangekar-Pawar political tussle
Nilangekar-Pawar political tussle

निलंगा  : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे नेते आहेत मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे औसा विधानसभा मतदार संघातून आपण त्यांच्याकडे उमेदवारी मागणार असल्याचे मुख्यमंत्र्याचे खासगी स्विय सहाय्यक अभिमन्यू पवार यांनी कासारसिरशी ता. निलंगा येथे शुक्रवारी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

या मतदार संघातून पालकमंत्र्याचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यासह अनेकजण इच्छूक आहेत .  

निलंगा तालुक्यातील जवळपास 68 गावे औसा विधानसभा मतदार संघाला जोडण्यात आली आहेत. त्यामध्ये कासारसिरशी, कासारबालकुंदा, सरवडी, मदनसुरी यासह अन्य मोठ्या गावांचा समावेश आहे. हा मतदार संघ भाजप शिवसेना युतीत शिवसेनेकडे असला तरी निवडणूकीच्या अखेरच्या टप्प्यात तडजोड होऊन कोणाला सुटणार याबाबत स्पष्टता नसली तरी तो भाजपाला सुटेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 ते म्हणाले की, आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भागाचा म्हणावा तसा विकास झाला नाही असे सांगून मतदार संघासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने विविध विभागाकडून जवळपास आडीचशे कोटी रूपयाचा निधी मंजूर करून आणला आहे.

त्यामध्ये पाणीपूरवठा, रस्ते, इमारती आदीचा समावेश आहे. कासारसिरशी हा स्वतंत्र तालुका करण्याचे आपले व्हीजन असून नगरपंचायत करण्याबरोबरच औसा येथे सोयाबीन प्रक्रिया उद्योग असे विविध कामाचे नियोजने असल्याचे यावेळी सांगितले.

 माझे आजोबा, वडील संघपरीवाराचे जोडले होते. त्यामुळे आपणास निश्चित याचा फायदा होणार आहे. हा मतदार संघ शिवसेनेकडे असला तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा अशिर्वाद आपल्या पाठीशी असून मतदार संघ भाजपाकडे येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

या मतदार संघातून पालकमंत्र्याचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यासह अनेकजण इच्छूक आहेत .  अरविंद पाटील निलंगेकर यांनीही मदनसुरी, बामणी, सरवडी, हासोरी या भागात विविध कार्यक्रम घेऊन दौरे सुरू केले आहेत. 

मदनसुरी येथा तर अभिमन्यू पवार व अरविंद पाटील निलंगेकर यांचे वेगवेगळ्या बैठका झाल्या त्यांमुळे या भागातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. मतदार संघ शिवसेनेला राहणार की भाजपला सुटणार उमेदवारी 'निलंगेकर'  की 'पवार' यांना मिळणार याबाबत कार्यकर्त्यांत उत्सूकता आहे. 

अभिमन्यू पवार व पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची विकासाच्या श्रेयावरून अंतर्गत कुरघोडी सुरू असली तरी अलिकडच्या काळात एकमेकापासून दूरच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकीय कुरघोडीत कोण बाजी मारणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. 

निलंगा तालुक्यातील  68 गावात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे वर्चस्व आहे. अभिमन्यू पवार यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपण उमेदवारी मागणार असल्याचे सांगितले असले तरी विधानसभेचा गढ जिंकण्यासाठी त्यांना स्थानिक सामंजस्य साधावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com