मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवारांच्या विरोधात भाजपमधून बंडखोरी

मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवारांच्या विरोधात भाजपमधून बंडखोरी

लातूर : भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नाराजांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. यात लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी औशात बंडखोरी केली आहे

त्यांच्या या बंडखोरीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळालेल्या अभिमन्यू पवार यांना नेमका विरोध कुणाचा अशी चर्चा रंगू लागली आहे.

जिल्ह्याची उत्कटता शिगेला पोहोचली होती की औसा मतदारसंघातून उमेदवारी कुणाला मिळणार! अखेर परंपरागत शिवसेनेची ही जागा भाजपला सोडण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र, येथील भूमीपुत्रच आपला प्रतिनिधी असावा अशी मागणी औसेकरांची आहे, असे म्हणत जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव यांनी तयारी सुरू केली होती. शिवाय प्रचारही सुरू केला होता. मात्र, मंगळवारी भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून यामध्ये औसा मतदारसंघासाठी अभिमन्यू पवार यांचे नाव घोषित करण्यात आले आहे

दुसरीकडे बजरंग जाधव यांनी बंडखोरी केल्याने यामागे नेमके कारण काय? असा सवाल उपस्थित होत आहे. बजरंग जाधव हे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्तीय आहे. त्यांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण असतानाही हे बंडखोरीचे अस्त्र का, असा सवाल कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com