अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस; मुख्यमंत्री सहायता निधीला तीन लाख ३९ हजाराची मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार सध्या चर्चेत आहेत. येणारी विधानसभेची निवडणुकीसाठी त्यांनी औसा मतदारसंघातून जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या पाच सहा महिन्यात त्यांनी या मतदारसंघात १५० कोटी पेक्षा अधिकची विकास कामे मंजूर करून घेतली आहेत.
अभिमन्यू पवार यांचा वाढदिवस; मुख्यमंत्री सहायता निधीला तीन लाख ३९ हजाराची मदत

लातूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार सध्या चर्चेत आहेत. येणारी विधानसभेची निवडणुकीसाठी त्यांनी औसा मतदारसंघातून जोरदार तयारी सुरु केली आहे. गेल्या पाच सहा महिन्यात त्यांनी या मतदारसंघात १५० कोटी पेक्षा अधिकची विकास कामे मंजूर करून घेतली आहेत.

यात त्यांचा एक जुलै रोजी मतदारसंघात जोरदार वाढदिवस साजरा झाला. हारतुरे, पोस्टर, बॅनर्सला फाटा देत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. यातून तीन लाख ३९ हजार रुपये जमा झाले याचा धनादेश  पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांच्याकडे सुपूर्द केला आहे.

नेत्याचा वाढदिवस म्हणजे हारतुरे, बुके, पोस्टर्स, बॅनर्स, जाहिरातीवर मोठा खर्च केला जातो. श्री. पवार यांनी मात्र याला फाटा दिला. फुलांचे हार, बुके आणण्याऐवजी वह्या पेन आणण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच मदत करायचीच असेल तर मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करावी असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते.

पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद त्यांचे सहकारी, मित्र, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हजारो वह्या, शेकडो पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य दिले. मतदारसंघातील गरजू विद्यार्थ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच ३९ जणांनी एकूण ३ लाख ३९ हजार २१२ रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस केली.  पवार ही मदत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com