abhimanyu pawar and cm | Sarkarnama

औशात अभिमन्यू पवार यांच्याविरोधातील भूमिपुत्रांच्या तलवारी म्यान

हरी तुगावकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यामुळे राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या औसा विधानसभा मतदारसंघात भूमिपूत्रांनी अखेर आपली तलवार म्यान केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किरण उटगे यांनी आपले उमदेवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आता श्री. पवार विरुद्ध कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील अशीच लढत होणार आहे. गेल्या काही महिन्यापासून श्री. पवार यांनी औसा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात होती. 

ही जागा शिवसेनेला सोडावी या करीता माजी आमदार दिनकर माने यांचा आग्रह होता. तर भारतीय जनता पक्षातील एका गटाने या मतदारसंघात श्री. पवार यांना विरोध करीत भूमिपूत्रालाच उमदेवारी द्यावी असा जोर धरला होता. श्री. पवार हे मुख्यमंत्र्यांचेच उमेदवार असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर माजी आमदार दिनकर माने, किरण उटगे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बजरंग जाधव यांनी व त्यांच्या समर्थकांनी औशात रास्तारोको आंदोलन केले. तीन तास हा रास्तारोको करण्यात आला. पण त्याचा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर काहीच परिणाम झाला नाही. भव्य रॅली काढून श्री. पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करीत आपली ताकद दाखवून दिली होती. त्याच वेळी श्री. माने, श्री. उटगे व श्री. जाधव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

या सर्व बंडखोरीची पक्षश्रेष्ठींनी दखल घेत कानपिचक्‍याही दिल्या. सोमवारी मंत्री तानाजी सावंत औशात दाखल झाले. त्यांनी श्री. माने यांच्यासोबत शिवसैनिकांची बैठक घेवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. श्री. माने यांचे वर्षभरात राजकीय पुनर्वसन करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. त्यानंतर हे सर्वजणांनी तहसील कार्यालयात जावून श्री. माने यांचा अर्ज मागे घेतला. दरम्यान श्री. उटगे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता बजरंग जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ठेवला आहे. मुख्य भूमिपूत्रांनी तलवारी म्यान केल्याने या मतदारसंघात श्री. पवार विरुद्ध कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यातच लढत होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख