अभिमन्यू पवार यांच्यासाठी महायुती लागली एकदिलाने कामाला....

अभिमन्यू पवार यांच्यासाठी महायुती लागली एकदिलाने कामाला....

औसा : औसा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्यासाठी भाजपा, शिवसेना, रासप, रयत क्रांती संघटना, रिपाई (आ.) आणि शिवसंग्राम संघटना एकत्रितपणे कामाला लागली आहे. सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत असून यामुळे अभिमन्यू पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नेत्यांची दुसरी पिढीही प्रचारात आघाडीवर असल्याचे पहावयास मिळत आहे. अभिमन्यू पवार आणि शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांचे पुत्र प्रचारात आघाडीवर आहेत. 

मुख्यमंत्र्यांची सावली म्हणून वावरणारे अभिमन्यू पवार यांना महायुतीच्या वतीने औसा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पवार यांनी मागच्या दोन वर्षांपासून मतदारसंघात विकासकामांची पेरणी केली आहे. जवळपास तीनशे कोटी रुपयांचा निधी मतदारसंघातील विविध योजना आणि कामांसाठी त्यांनी मंजूर करून आणला. यामुळे त्यांना विकासकामांवर जनाधार मिळत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती झालेली असल्याने सर्वच पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अभिमन्यू पवार यांच्या बरोबरीने प्रचारात सहभागी होत आहेत. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने हे प्रत्येक सर्कल आणि गावात स्वतः सभा आणि भेटीगाठी घेत आहेत. 

या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नेत्यांची पुढची पिढी आता मैदानात उतरली आहे. अभिमन्यू पवार यांचे सुपुत्र परीक्षित पवार, दिनकर माने यांचे चिरंजीव अमित माने यांनी बैठका आणि भेटीगाठींचा धडाका लावला आहे. या युवकांना जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. युवकांमध्ये मिळून मिसळून हे युवा नेते संवाद साधत आहेत . त्यांची बोलण्याची शैली, संवाद साधण्याची कला युवकांना आकर्षित करत आहे . यामुळे मतदारसंघातील युवक वर्ग महायुतीशी जोडला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाल्याने औसा मतदारसंघात भाजपमय वातावरण झाले आहे. दिनकर माने यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी अभिमन्यू पवार यांच्या विजयासाठी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. 

संकल्प पत्राचे आकर्षण .. 
औसा मतदारसंघासाठी अभिमन्यु पवार यांचे संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आले आहे .मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचा त्यांचा निर्धार या माध्यमातून स्पष्ट दिसत आहे. सामान्य नागरिक, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांच्या संकल्पनेतील योजनाबद्दल जाणून घेण्याची उत्सूकता मतदारांमध्ये दिसत आहे. या संकल्प पत्रामुळे मतदारसंघातील नागरिक अभिमन्यु पवार यांच्याशी जोडले जात असल्याचे चित्र आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com