abhimanyu pawar and ausa | Sarkarnama

तिकीटाच्या लढाईचा अर्धा चक्रव्युह "अभिमन्यू' यांनी भेदला

हरी तुगावकर
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

लातूर : लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना गेल्या काही महिन्यापासून पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याचीच चर्चा जिल्हाभरात होती. अखेर पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यातून अभिमन्यू यांनी राजकीय फडातील अर्धे चक्रव्युह भेदले आहे. खरी लढाई पुढे आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात औसा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना गेल्या काही महिन्यापासून पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याचीच चर्चा जिल्हाभरात होती. अखेर पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत अभिमन्यू पवार यांना औशातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यातून अभिमन्यू यांनी राजकीय फडातील अर्धे चक्रव्युह भेदले आहे. खरी लढाई पुढे आहे. उर्वरीत चक्रव्युह भेदण्यासाठी आता त्यांना वेगळी व्युहरचना करावी लागणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अभिमन्यू पवार यांना आपल्या सोबत घेतले. स्वीय सहायक म्हणून त्यांची नियुक्ती केली. या पाच वर्षाच्या कालावधीत श्री. पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून काम केले. मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यभरातील हजारो गोरगरीब रुग्णांना मदत केली. पक्षातही चांगले संबंध ठेवले. आपल्या कार्यशैलीने काही मंत्री देखील त्यांच्याजवळचे झाले होते. 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी येथे येवून जाहीर कार्यक्रमातून श्री. पवार यांच्या कार्याचे कौतुकही केले होते. गेल्या काही महिन्यापासून श्री. पवार यांनी औसा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले होते. मतदारांना आपले करण्यासोबतच त्यांनी औसा मतदारसंघासाठी 254 कोटीच्या विविध योजना मंजूर करून आणल्या. यातूनही मतदारसंघातील लोक त्यांच्याकडे नेता म्हणून पाहू लगले होते. जाहीर कार्यक्रमातून त्यांनी आपण औसा मतदारसंघातून लढणार असे जाहीर केले होते. हे सर्व करीत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांचा श्री. पवार यांना पाठिंबाच होता. त्यामुळे श्री. पवार यांना काम करण्याचे अधिक बळ मिळत गेले. पण श्री. पवार हे मैदानात उतरल्यानंतर औशातील स्थानिकांनी मात्र त्यांना घेरण्यास सुरवात केली. 

स्थानिक भूमिपूत्रालाच उमेदवारी मिळावी म्हणून जोर सुरु झाला होता. पोस्टरबाजीही करण्यात आली. ही पोस्टर स्पर्धा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली होती. पक्षातील कार्यकर्त्यांकडूनच श्री. पवार यांना डावलणे चालले होते. त्यामुळे श्री. पवार यांना आपली वेगळी फळी निर्माण करून काम करावे लागत होते. पक्षांतर्गत गटबाजीमुळे श्री. पवार यांना उमेदवारी मिळते की नाही याचीची चर्चा सुरु झाली होती. पण शेवटी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत श्री. पवार यांना औसा मतदारासंघातून उमेदवारी जाहीर करून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. राजकीय फडातील अर्धा चक्रव्युह अभिमन्यू पवार यांनी भेदला आहे. आता खरी लढाई पुढे असून यात ते किती यशस्वी होतात याकडे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख