आवाज दाबण्यासाठी गायकवाड यांनी बॅनर हिसकावला : पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत झालेली आमदारांतील धक्काबुक्की चर्चेचा विषय ठरली आहे.
आवाज दाबण्यासाठी गायकवाड यांनी बॅनर हिसकावला : पवार

नागपूर : विरोधकांना निव्वळ गोंधळ घालायचा आहे. आम्हाला प्रश्‍न मांडायचे आहेत. यासाठी आपण विरोधकांच्या हातातील बॅनर हिसकावल्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहाबाहेर सांगितले.  दुसरीकडे अभिमन्य पवार यांनी आमचा आवाज दाबण्यासाठी गायकवाड यांनी बॅनर हिसकावल्याचा आरोप केला.

बॅनरच्या ओढताणीवरून सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. धक्काबुक्कीमुळे यात आणखीच भर पडली.
गायकवाड म्हणाले, सभागृहाचे कामकाम कालपासून सुरू झाले. यंदा केवळ सहा दिवसांचे अधिवेशन असल्याने वेळ कमी आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघासह राज्याचे प्रश्‍न तातडीने सुटण्यासाठी सभागृहात चर्चा महत्त्वाची आहे.

विषय लावून धरणार : अभिमन्यू पवार
अवकाळी पावसाने शेतमालाचे नुकसान झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज्याचा दौरा करून हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले होते. ही मदत ताबोडतोब का दिली जात नाही असा आमचा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच मागणीचे स्मरण करून देण्यासाठी आम्ही सभागृहात बॅनर झळकावले. त्यात सत्ताधाऱ्यांना एवढा राग येण्याचे कारण काय असा सवाल आमदार अभिमन्यू पवार यांनी केला.
आम्ही अध्यक्षांना बॅनर दाखवून मदतीची मागणी करीत होतो. मात्र, आमदार गायकवाड यांनी आमचा आवाज दाबण्यासाठी बॅनर हिसकावले. त्यावरून गोंधळ उडाला. आता आमच्यावर गोंधळ घातल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही. हा विषय सातत्याने सभागृहात लाऊन धरला जाईल, असेही अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, ``परंतु, विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासूनच गोंधळ घालत आहेत. माझा मतदारसंघ असलेला बुलढाणासह विदर्भातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. मात्र, विरोधी पक्ष गोंधळ घालून प्रश्‍न मांडू देत नाही. कालपासनू सभागृहात बॅनरबाजी सुरू आहे. आज अर्थमंत्री जयंत पाटील माहिती देत होते. त्यावेळी विरोधी पक्षातील आमदार त्यांच्या तोंडासमोर बॅनर झळकवित होते. अध्यक्षांनाही त्यांना चेहरा दिसू नये असे प्रयत्न केले जात होते. जयंत पाटलांनी अध्यक्षांना अनेकदा संरक्षण मागितले. तरीही विरोधी पक्षाचा गोंधळ कायम होता. अध्यक्षांनी बॅनर झळकविण्यांची नावे नोंदविण्याची सूचना केली. तरीही, कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी मंत्र्यांच्या संरक्षणासाठी आम्ही पुढे आलो आणि बॅनर फाडल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com