अब्दुल सत्तार यांनीही पोलीस संरक्षण, वाहन काढून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र 

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले पोलिस संरक्षण आणि वाहन काढून घेऊन ते संचारबंदीची काटेकोरपण अंमलबजावणीसाठी वापरावे असे लेखी पत्र जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहे .
Abdul Sattar requests to withdraw security personnel and deploy for corona bandobast
Abdul Sattar requests to withdraw security personnel and deploy for corona bandobast

औरंगाबाद :राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले पोलिस संरक्षण आणि वाहन काढून घेऊन ते संचारबंदीची काटेकोरपण अंमलबजावणीसाठी वापरावे असे लेखी पत्र जिल्हाधिकारी तथा औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहे .

राज्यात लॉक डाऊन नंतर सर्वत्र संचारबंदी जारी करण्यात आली आहे. आवश्यक सेवा वगळता कुणालाही बाहेर न पडण्याचे आवाहन केल्यानंतरही काही प्रमाणात लोक घराबाहेर पडत आहेत . अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांना घरी बसवण्यात येत आहे .कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी केंद्र ,राज्य सरकार तसेच जिल्हा पातळीवरील आरोग्य यंत्रणा , प्रशासन अहोरात्र झटत आहेत .

अशावेळी पोलीस यंत्रणांवर देखील अतिरिक्त ताण आहे. जनतेचे आरोग्य आणि संचार बंदीची योग्य अंमलबजावणी सर्वात महत्वाची असल्यामुळे राजशिष्टाचार म्हणून राज्यमंत्र्यांना पुरवण्यात येणारी सुरक्षा यंत्रणा, पोलीस कर्मचारी व  वाहन संचार बंदीच्या कामात उपयोगी पडावे या हेतूने महसूल व ग्राम विकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपली पोलीस सुरक्षा व वाहन काढून घ्यावेअसे सूचित केले आहे.

यासंदर्भातील लेखी पत्र सत्तार यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी व ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना पाठवले आहे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com