आजचा वाढदिवस : अब्दुल सत्तार आमदार, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ, कॉंग्रेस - abdul sattar mla aurangabad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : अब्दुल सत्तार आमदार, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ, कॉंग्रेस

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जानेवारी 2018

अब्दुल सत्तार यांनी 1984 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्तार यांनी तालुक्‍याच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत 1994-95 मध्ये सिल्लोड नगरपालिकेची निवडणूक लढवली त्यानंतर ते नगराध्यक्षही झाले. नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारणाचा पाया मजबूत केल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधानसभेची उमेदवारी मागितली. परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यांनी लक्षवेधी मते मिळवली, पण त्यांचा पराभव झाला.

अब्दुल सत्तार यांनी 1984 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्तार यांनी तालुक्‍याच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करत 1994-95 मध्ये सिल्लोड नगरपालिकेची निवडणूक लढवली त्यानंतर ते नगराध्यक्षही झाले. नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारणाचा पाया मजबूत केल्यानंतर 1999 मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधानसभेची उमेदवारी मागितली. परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली त्यांनी लक्षवेधी मते मिळवली, पण त्यांचा पराभव झाला. 2001 मध्ये कॉंग्रेसने अब्दुल सत्तार यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेवर घेतले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून अब्दुल सत्तार यांनी मोदी लाटेतदेखील विजय संपादन करत आपली ताकद सिद्ध केली. अब्दुल सत्तार हे सध्या औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून अब्दुल सत्तार ओळखले जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख