अब्दुल सत्तारांमुळे आता शिवसेना जिल्हा परिषदेत नंबर वन 

शिवसेनेची सदस्यसंख्या निश्‍चितच वाढली आहे. अजून काही कॉंग्रेस सदस्य शिवसेनेत येण्याची शक्‍यता आहे. शिवेनेचे वरिष्ठ नेते ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे जिल्हा परिषदेत होईल.- अविनाश गलांडे पाटीलशिवसेना गटनेते , जिल्हा परिषद.
abdul_sattar
abdul_sattar

औरंगाबाद : ग्रामीण भागातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या व मिनी मंत्रालय म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत यापुर्वी आमदार अब्दुल सत्तार यांच्यामुळे सत्ता समीकरण बदलले होते. आता पुन्हा त्यांच्या शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्याने जिल्हा परिषदेचे सत्ता समीकरण बदलणार आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना मोठ्या भावाच्या भुमिकेत राहणार आहे. 


जिल्हा परिषदेच्या 62 सर्कलमधून 2017 मध्ये भाजपचे 23 सदस्य निवडून आले तर शिवसेनेचे 19 सदस्य निवडून आले होते. यामुळे भाजपकडून आम्ही मोठा भाउ झालो आहोत यामुळे अध्यक्ष आमचाच झाला पाहीजे अशी भुमिका घेतली होती. त्यावेळी शिवसेना आणि भाजप मिळून 42 सदस्य झाले असते. 

मात्र त्यावेळी शिवसेनेने कॉंग्रेससोबत आघाडी करुन अध्यक्षपद आपल्याकडे आणि उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडे ठेवले. यामुळे मोठ्या संख्येने सदस्य निवडून येवूनही भाजपला जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसावे लागले होते, याचे शल्य अखेरपर्यंत बोचत आहे. आता तर अब्दुल सत्तार यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करुन ते आमदार झाले आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  


त्यावेळी त्यांच्याबरोबरच सिल्लोड तालूक्‍यातील अंधारी सर्कलचे केशवराव तायडे, उंडणगाव सर्कलच्या सीमा गव्हाणे, सोयगाव तालूक्‍यातील फर्दापुर सर्कलचे गोपीचंद जाधव आणि कन्नड तालूक्‍यातील कुंजखेडा सर्कलमधून निवडून आलेले समाजकल्याण समिती सभापती धनराज बेडवाल या चौघांनी शिवबंधन बांधले होते. 


तसेच शुक्रवारी (ता.एक) फुलंब्री तालूक्‍यातील वडोदबाजार सर्कलमधून निवडून आलेले किशोर बलांडे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातुन शिवबंधन बांधून घेतले. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रा. रमेश बोरनारे हे वैजापुर विधानसभा मतदार संघातुन निवडून आल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला, यामुळे एकने सदस्य संख्या कमी झाली तर श्री. बलांडे यांच्या प्रवेशाने शिवसेनेची सदस्य संख्या पुर्ववत 19 झाली आहे.


 याशिवाय आमदार सत्तार यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेची एकूण सदस्य संख्या आता 23 झाली आहे. आमदार अब्दुल सत्तार आणखी जिल्हा परिषद सदस्यांना शिवबंधन बांधून कॉंग्रेसला जिल्हा परिषदेत मोठे खिंडार पाडू शकतात यामुळे आता जिल्हा परिषदेत शिवसेना मोठ्या भावाच्या भुमिकेत जाण्याची चिन्हे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com