शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे होईलच - आमदार अब्दुल सत्तार   

..
Sattar-enters-ShivSena
Sattar-enters-ShivSena

औरंगाबाद: भाजपतर्फे काय वक्‍तव्य केली जात आहे. हे मला माहित नाही. मात्र, 7 तारखेच्या आत सत्ता स्थापन होत, अडीच  वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. असा दावा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी "सरकारनामाशी' बोलताना केला आहे. मुंबईहून परतलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

राज्यात मुख्यमंत्री कोणाचा यावरून सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. एकीकडे भाजप सत्ता स्थापनेसाठी आकड्यांची जुळवा-जुळव करीत आहे. तर दुसरीकडे शिवसेना लोकसभा निवडुकीत जे ठरले त्या नियमावर अडून आहे. तसेच शिवसेनेतर्फेही मुख्यमंत्री पदाच्या मागणीसाठी दबावतंत्र वापरले जात आहे. 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 7 तारखेच्या आत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल. असा थेट इशारा शिवसेनेला दिला आहे. त्याच्या वक्‍तव्यावर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. सत्तार म्हणाले, शिवसेनेला वेळेत सत्ता स्थापन होईल.

भाजपने काय वक्‍तव्य केले मला माहित नाही. मात्र सात तारखेच्या आत सत्ता स्थापन होईल.आणि अडिच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील. राष्ट्रपती राजवटी विषयी सत्तार म्हणाले, शिवसेनेला सगळे नियम आणि धोरण माहिती आहे. कोणत्याही राजवटीला आम्ही घाबरत नाही. आमचा सत्ता येणार आणि आमचा मुख्यमंत्री होणारच असेही सत्तार म्हणाले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com