abdul sattar and maratha kranti morcha | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचाही राजीनामा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबाद : माजीमंत्री व सिल्लोड-सोयंगाव मतदारसंघाचे विद्यमान कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (ता.30) मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवत आपला राजीनामा विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे सुपूर्द केला. कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव, वैजापूर राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यापाठोपाठ सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे जिल्ह्यातून राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या तीन झाली आहे. 

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर सत्तार यांनी मराठा समाजावर आरक्षणाच्या बाबतीत हे सरकार अन्याय करत असल्याचा आरोप करत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. विधानसभचे प्रधान सचिव अनंत कळसे यांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे पत्र त्यांना दिले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख