आपच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्या जातीवरून वादळ 

आतिशी मार्लेना यांची लढत भाजपचे उमेदवार आणि नावाजलेले क्रिकेटपटू गौतम गंभीर तसेच काँग्रेसचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष अरविंदसिंग लव्हली यांच्याशी असून १२ मे रोजी मतदान आहे .
Aatishi-Marlena.
Aatishi-Marlena.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या दिल्ली - पूर्व लोकसभा  मतदारसंघाच्या उमेदवार आतिशी मार्लेना यांच्या जातीवरून विरोधकांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे .  आतिशी मार्लेना यांची लढत भाजपचे उमेदवार आणि नावाजलेले क्रिकेटपटू गौतम गंभीर तसेच काँग्रेसचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष अरविंदसिंग लव्हली यांच्याशी असून १२ मे रोजी मतदान आहे . 

  आतिशी मार्लेना यांची जात नेमकी कोणती असा जाहीर सवाल काँग्रेसचे आमदार असिफ मोहम्मद खान  यांनी भरसभेत केला .  आतिशी मार्लेना यांनी २०१८ मध्ये सोशल मीडियावर आपल्या नावातील मार्लेना काढून फक्त  आतिशी  असे ठेवले . त्यावेळी भाजपतर्फे आतिशी मार्लेना या ख्रिश्चन असल्याचा छुपा प्रचार सुरु होता असे आपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे . उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी  आतिशी मार्लेना या नावानेच भरला पण ईव्हीएम वरील मतपत्रिकेत त्यांचे नाव फक्त  आतिशी एवढेच असणार आहे . 

आपल्या नावावरून वादळ उठल्यानंतर   आतिशी मार्लेना   यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले ,"माझे वडील विजयकुमार सिंग हे दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होते . 
ते डाव्या विचारसरणीचे असल्याने त्यांनी लहानपणीच कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या नावांचे मिश्रण मार्लेना असे करून करून माझ्या नावासमोर जोडले . माझया पतीचे नाव प्रवीण सिंग असे आहे . मी पंजाबी राजपूत आहे .माझ्या जाती धर्मावरून वाद करण्यापेक्षा मी दिल्लीतील शासकीय शाळांमध्ये केलेल्या कामावर चर्चा झाली तर बरे होईल ."
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून काँग्रेस आणि भाजप वर टीका करून  आतिशी मार्लेना या पंजाबी राजपूत  असल्याचा  अखेर खुलासा केला होता . त्यावर निवडणूक आयोगाने काँग्रेस , भाजपला सोडून आपच्या सिसोदिया यांचा नोटीस  बजावली आहे . 

 आतिशी मार्लेना  आपच्या प्रवक्त्या असून शिक्षण सल्लागार म्हणून त्यांनी दिल्लीच्या शासकीय शाळांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. खाजगी आणि कॉन्व्हेंट शाळांपेक्षा शासकीय शाळांचे निकाल आणि टक्केवारी अधिक झाली आहे . शासकीय शाळांचे विद्यार्थी राष्ट्रीय  परीक्षांत मोठे यश मिळवीत असल्याने  आतिशी मार्लेना यांच्या उपक्रमांची प्रशंसा झाली आहे .  आतिशी मार्लेना या दिल्ली विद्यापीठाच्या टॉपर असून त्यांनी २००५ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम. ए . केलेले आहे . त्यांनी भाजपच्या गौतम गंभीर यांच्यासमोर गंभीर आव्हान उभे केले आहे . हिंदी चित्रपट अभिनेत्री स्वरा भास्करने  आतिशी मार्लेना यांच्यासाठी प्रचारात सहभाग घेतला आहे . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com