Aatalji was straight forward politician : Udhhav Thakre | Sarkarnama

अटलजी  सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी : उध्दव ठाकरे

सरकारनामा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

शिवसेना प्रमुखांशी त्यांचा स्नेह जगजाहिर होता. अनेक विषयावर त्यांच्यात चर्चा होत असत.

मुंबई : अटलजी अपल्यात नाहीत यावर विश्‍वास ठेवायला मन तयार होत नाही. अटलजी आमच्या ऱ्हदयात आहेत. सैदव राहतील. अहंकार, गर्व, सत्तेपासून निर्माण होणारा ताठरपणा त्यांच्यापासून मैलो दूर होता. ते सरळ स्वभावाचे, निष्कपट राजकारणी होते," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे . 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले ," राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व लहान मोठ्‌या घटन दलांच्या हातात हात घालून त्यांनी सरकार पुढे नेले. त्यांना भेटण्याचा योग अनेकदा आला. एका वडीलधाऱ्याच्या मायेनं त्यांनी प्रेम केले. सदैव आशीर्वाद दिले. त्यांचे निर्मळ मन व सदैव हसतमुख चेहरा म्हणजे भारतीय राजकणारणाची प्रेरणा होती. शिवसेना प्रमुखांशी त्यांचा स्नेह जगजाहिर होता. अनेक विषयावर त्यांच्यात चर्चा होत असत. "

"अटलजींचा सर्वांना सोबत घेवून जाण्याच्या भूमिकेमुळे 'एनडीए' मजबूत राहिली. अटलजींच्या जाण्याने संसदीय लोकशाहीची प्रचंड मोठी हानी झाली आहे. शिवसेना प्रमुखानंतर आम्ही आणखी एक भीष्म पितामह गमावला. त्यांच्या महान व्यक्‍तीमत्वास सांष्टांग दंडवत घालून आम्ही विनम्र आदरांजली वाहत आहोत."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख