aasud yatra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मोदींनी "हे' धाडस दाखवावे : बच्चू कडू 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे भांडवलदार, उद्योजकांचे सरकार आहे. मोदींनी शेतीमालावर निर्यात बंदी आणण्यापेक्षा भांडवलदारांच्या मालावर निर्यात बंदीचे धाडस दाखवावे, असे आव्हान आमदार बच्चू कडू यांनी दिले.

सातारा : भारतीय जनता पक्षाचे सरकार हे भांडवलदार, उद्योजकांचे सरकार आहे. मोदींनी शेतीमालावर निर्यात बंदी आणण्यापेक्षा भांडवलदारांच्या मालावर निर्यात बंदीचे धाडस दाखवावे, असे आव्हान आमदार बच्चू कडू यांनी दिले. अपंगांची मानधन वाढ केली नाही तर मे महिन्यात सामाजिक न्यायमंत्र्यांची गाडी फोडण्याचा
इशारा त्यांनी साताऱ्यात दिला. 

आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "सीएम टू पीएम' आसूड यात्रा काल रात्री कऱ्हाडातून साताऱ्यात दाखल झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुण्याकडे मार्गस्थ झाली. 

आमदार कडू म्हणाले, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी राज्यातील सर्व संघटनांना एकत्र करून निर्णायक लढा उभारला जाईल. आसूड यात्रा सुरू झाल्यावर शासन एक लाखांपर्यंत कर्जमाफीपर्यंत आले आहे. यात्रा 21 एप्रिलला संपेपर्यंत संपूर्ण कर्जमाफी झालेली असेल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, शेतकऱ्यांना लुटण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. त्याचा हिशोब मांडला तर सरकारकडेच शेतकऱ्यांचे पैसे फिरतील. तुरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असताना केंद्राने 20 लाख
क्विंटल तूरडाळ आयात केली आहे. आता तूर ठेवायला जागा नाही. त्यामुळे दर पडले आहेत. निर्यातबंदी घातली नसती तर शेतकऱ्याला चार पैसे मिळाले असते.

केंद्राने सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अपंगांना शासन मानधनवाढ करत नाही. मात्र, आमदारांचे मानधन वाढवत आहे. आमदार गरीब आणि अपंग श्रीमंत अशी परिस्थिती आहे काय, असे सांगून अपंगांच्या मानधनात वाढ न केल्यास मे महिन्यात सामाजिक न्यायमंत्र्यांची गाडी
फोडली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. 

े 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख