aasud morcha | Sarkarnama

आसूड यात्रेवर गुजरात पोलिसांचा "आसूड'

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई : शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्याची मागणी करत स्वामिनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारून तत्काळ शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या "आसूड यात्रा' या आंदोलनावरच गुजरात पोलिसांनी आसूड उगारले आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या आसूड यात्रेला गुजरात पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. यामुळे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण असून यासंबंधी राज्य सरकारने तत्काळ लक्ष घालण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी करत राज्यभरात आसूड यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेद्वारे शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावात ही आसूड यात्रा जाणार आहे. आज गुजरातच्या हद्दीत प्रवेश करताच गुजरात पोलिसांनी परवानगी नाकारत आसूड यात्रा रोखून धरली आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी भाजप सरकारचा निषेध नोंदवला आहे. याबाबत आमदार बच्चू कडू म्हणाले," गुजरातच्या सीमेवरच आम्ही ठिय्या करणार आहोत.गुजरात सरकार व "पंतप्रधान नरेंद्र मोदींने गुजरातमध्ये आसूड यात्रेस प्रवेश नाकारून न्याय मागणी ठोकरून लावली आहे. या सरकार हुकूमशाहप्रमाणे वागत असून त्यांनी कार्यकर्त्यांचे मोबाईल सेट देखील गुजरात पोलिसांनी हिसकावून घेतले आहेत. गुजरात सरकार विनाकारण परिस्थिती स्फोटक करत असून वातावरण दूषित करण्याचे काम गुजरातच्या पोलिसांनी केली आहे.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख