आपचे लक्ष आता महाराष्ट्राकडे; नवी मुंबई, औरंगाबाद महापालिकेपासून श्रीगणेशा

नवी मुंबई आणि औरंगाबादबाबत 'आप'ची प्राथमिक चाचपणी झाली असून जेथे स्थानिक कार्यकर्ते आहेत तेथे उमेदवार उभे करावेत काय याचा अहवाल मोहल्ला कमिटीने पाठवावा असे सांगण्यात आले आहे. नवी मुंबईतील 111 वॉर्डांपैकी 35 वॉर्डांची जबाबदारी एकेका नेत्यावर सोपवण्यात आली आहे
Aam Admi Party To Concentrate on Maharashtra
Aam Admi Party To Concentrate on Maharashtra

मुंबई : दिल्लीतील नेत्रदीपक यशानंतर तेथील आश्‍वासनांची पुर्तता करतानाच काही राज्यांमध्ये विस्तार करण्याचा निर्णय आपने घेतला असून अरविंद केजरीवालांच्या यादीत महाराष्ट्राचे स्थान यासंदर्भात सर्वात वरचे आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या निवडणुकांच्या रिंगणात उतरणे शक्‍य असेल तेथे स्थानिक समित्यांनी तसे निर्णय घ्यावेत असे आज कळवण्यात आलेआहे.

''महानगरीय मतदारांमध्ये आपले अस्तित्व दाखवण्याची संधी नवी मुंबई आणि औरंगाबादेत होणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे चालून येत असून या दोन्ही ठिकाणी उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय झाला आहे, दिल्लीतील विजयानंतर आनंदी झालो आहोत ,आता बिहार,राजस्थान, पंजाब आणि हरयाणा या राज्यांवर लक्ष दयायचे ठरले आहे. ऑगस्टमध्ये तयार झालेल्या राज्य कार्यकारिणीने महाराष्ट्रातील विधानसभात मिळवलेले मतदान खुदद अरविंद केजरीवाल यांच्या आश्‍चर्याचा अन कौतुकाचा विषय ठरले होत, त्यामुळे दिल्लीखालोखाल हे भविष्यात महत्वाचे राज्य ठरू शकते असे मानले जाते आहे.हरयाणा आणि महाराष्ट्रात एकाचवेळी निवडणुका झाल्या होत्या, हरयाणा दिल्लीला लागून असले तरी तिथल्या पेक्षा महाराष्ट्रात अधिक मते मिळाली होती,'' अशी माहिती आपचे नेते देवकरण यांनी दिली.

नवी मुंबई आणि औरंगाबादबाबत प्राथमिक चाचपणी झाली असून जेथे स्थानिक कार्यकर्ते आहेत तेथे उमेदवार उभे करावेत काय याचा अहवाल मोहल्ला कमिटीने पाठवावा असे सांगण्यात आले आहे. नवी मुंबईतील 111 वॉर्डांपैकी 35 वॉर्डांची जबाबदारी एकेका नेत्यावर सोपवण्यात आली आहे. कम्युनल, क्रिमीनल आणि करप्ट नसलेल्या उमेदवारांची शिफारस हे नेते करणार आहेत. या 35 ही जागांवर लढण्याचा आपचा इरादा असल्याचे समजते. नवी मुंबई किंवा औरंगाबाद येथे कोणत्याही पक्षाशी हातमिळवणी केली जाणार नाही, तेथे स्थानिक कार्यकर्ते,पत्रकार,स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काम करणारे नागरिक, बुध्दीजीवी यांनी उमेदवारीसाठी पुढे यावे असे आवाहनही केले जाणार आहे.

राष्ट्रीय सुकाणू समितीच्या सदस्य प्रिती शर्मा मेनन यासंदर्भात बोलताना म्हणाल्या, "महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस,शिवसेना यासारखे जबर प्रादेशिक अस्तित्व असणारे, भाजप कॉंग्रेससारखे राष्ट्रीय स्तरावरचे आणि मनसे ,बहुजन विकास आघाडीसारखे मते खेचणारे पक्ष आहेत. त्यात आम्हाला स्वत:साठी जागा तयार करणे हे आव्हान असेल, याची कल्पना आहे. पण आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात यापूर्वीहीआपने उमेदवार उभे केले होते. पण 2014 नंतर विधानसभेत प्रथमच नशीब अजमावले गेले.''

महाविकास आघाडीला मदत करण्याची तयारी

आपच्या विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राउत यांनी आमचे अभिनंदन केले. महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहे. या सरकारला दिल्लीप्रमाणे मोहल्ला क्‍लिनिक किंवा शाळासुधार अभियान राबवायचे असेल तर केजरीवालांची चमू मदत निश्‍चितपणे मदत करेल, असेही प्रिती शर्मा मेनन म्हणाल्या.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com