महाडिकांच्या राजकारणाने प्रभावित झाले आनंदराव खेडकर

दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्या राजकारणाने प्रभावित होऊन आपण हा निर्णय घेत असल्याचे आनंदराव खेडकर यांनी सांगितले.
महाडिकांच्या राजकारणाने प्रभावित झाले आनंदराव खेडकर

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ. अनुराधा खेडकर यांचे पती व माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, मुलगा माजी उपमहापौर सचिन खेडकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपाला पाठिंबा दिला.

एका बाजूला कॉंग्रेस आमदारांकडून गळचेपी तर दुसरीकडे आमदार महाडिक यांचे सकारात्मक राजकारण असे दोन विरोधी टोक असल्याचे दिसले. श्री. महाडिक यांच्या सर्वसमावेश कार्यपध्दतीने आपण प्रभावित झालो असून त्यामुळेच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. देशातील जनतेच्या मनामध्ये भाजपबद्दल आत्मियता आहे असे सचिन खेडकर यांनी यावेळी सांगितले.

आनंदराव खेडकर म्हणाले,"अत्यंत संयमीपणे श्री. महाडिक यांनी विकास कार्य सुरू केले आहे. म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार माझ्यासह कार्यकर्ते आमदार महाडिक यांच्या विजयासाठी मेहनत घेतील.' 

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले," खेडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतशील भारत संकल्पनेनुसार कार्य करूया.'  आमदार महाडिक म्हणाले,"आपण नेहमीच सर्वच घटकांचा विचार करून कार्यरत असतो. खेडकर गटाची ताकद मिळाल्याने आपल्याला मोठे बळ मिळाले आहे. यावेळी अमित खेडकर, युवराज जाधव, रमेश चौगले, हसतखान गोलंदाज, उदय वारके, पृथ्वीराज महाडिक आदि उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com