भाजपच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार आकाश फुंडकर - aakash fundkar appointed as bjp buldana district president | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी आमदार आकाश फुंडकर

सागर कुटे
बुधवार, 4 मार्च 2020

...

खामगाव ः खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार  आकाश फुंडकर यांची भाजपच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

फुंडकर हे दुसऱ्यांदा खामगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. खामगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची मजबूत पकड असून, आमदार आकाश फुंडकरांचा हा अनुभव लक्षात घेता त्यांना बुलडाणा जिल्हा भाजपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

आकाश यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, नगर सचिव अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हाध्यक्ष भाजप विद्यार्थी आघाडी पदी त्यांनी काम पाहिले आहे. यासोबतच त्यांनी संसदीय कार्य समिती सदस्य, अंदाज व नियोजन समिती सदस्य, सार्वजनिक उपक्रम मंडळ समिती, दक्षता व संनियंत्रण समिती या समित्यांवर त्यांनी काम पाहिले आहे. तसेच 2019 मध्ये त्यांची भाजपाच्या विधी मंडळ प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली होती. ता. 3 मार्च 2020 रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली.

मागील अनेक वर्षांपासून काँग्रसचे वर्चस्व असलेल्या खामगावात फुंडकर यांच्या नेतृत्वात मागील सहा वर्षांपासून मजबून पकड बनवत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदेवर भाजपचे सदस्य निवडून आणून ह्या संस्थांवर भाजपचा झेंडा फडकविला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख