aaditya thackrey shinoli programme | Sarkarnama

आदित्य ठाकरेंच्या पायऱ्यावरील संवादाची चर्चा जोरात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

बेळगाव विमानतळावरुन मोठा पोलीस फौजफाटा, बॉडीगार्ड, शिवसैनिकांच्या ताफ्यातच ते केदारी रेडेकर फौंडेशनच्या कार्यक्रमात दाखल झाले.

कोल्हापूर : चंदगड तालुक्‍यातील शिनोळी येथे आलेल्या आदित्य ठाकरे यांनी व्यासपीठावर जाण्यासाठी ठेवलेल्या स्टॅण्डवरील पायऱ्यावर बसून युवकांशी साधलेला संवाद आता चांगलाच चर्चेचा बनला आहे. 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आगमन झाले. बेळगाव विमानतळावरुन मोठा पोलीस फौजफाटा, बॉडीगार्ड, शिवसैनिकांच्या ताफ्यातच ते केदारी रेडेकर फौंडेशनच्या कार्यक्रमात दाखल झाले.

भव्य व्यासपीठावरुन ठाकरे युवकांशी काय संवाद साधणार हे विद्यार्थी, युवकांप्रमाणेच सेनेच्या नेत्यांनाही चिंता लागून राहिली होती. मात्र ठाकरे यांनी थेट हातात माईक घेत व्यासपीठावर जाण्यासाठी ज्या पायऱ्या लावण्यात आल्या होत्या, त्यावरच ठिय्या ठोकून युवकांशी संवाद साधला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख