तडीपारीला कायदेशीर उत्तर देणार : विजय साळवींची पहिली प्रतिक्रिया

Shivsena : दोन वर्षांसाठी विजय साळवींना तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
Vijay Salvi
Vijay SalviSarakarnama

कल्याण : कल्याणचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्याविरोधात तडीपाराची नोटीस बजावण्यात आली आहे. विजय साळवी उर्फ बंड्या साळवी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे.

Vijay Salvi
"एकेकाळी नथुरामचे पुतळे उभारू म्हणणारे हेच ते छगन भुजबळ!"

आता यावर तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेत उमटताना दिसून येत आहे. शिवसैनिकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सूडबुद्धीने या कारवाई होत आहेत. शिंदेंच्या गटात दाखल करून घेण्यासाठी सगळ्यांनी आपली तत्वे, निष्ठा, प्रामाणिकता गहाण ठेवायच्यात का ?असा प्रश्न साळवी आणि संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. तर आपल्याला नोटीस मिळाली असल्याचे साळवी यांनी साँगितले.

साळवी यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. माझ्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. माझ्यावरील सर्व गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे आहे. या कारवाईला कायदेशीर उत्तर देण्यात येईल, असे साळवी यांनी स्पष्ट केले.

Vijay Salvi
Supreme Court Live|बहुमत नसताना ठाकरे गटाला हकालपट्टीचा अधिकार नाही- नीरज कौल

महात्मा फुले पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये अनेक गुन्हे आपल्यावर दाखल आहेत. परिसरातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊन, त्यांच्यामध्ये तुमच्याकडून भीतीचे वातावरण पसरले आहे. तुमच्या गुन्हेगारी दहशतीमुळे नागरिक आपल्या विरुद्ध तक्रारीसाठी पुढे येत नाहीत. कायदा सुव्यवस्थेचा सांभाळण्यासाठी आणि तुम्हाला गु्न्हेगारी वृत्तीपासून दूर करण्यासाठी ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात येत आहे, असं सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश माने पाटील यांनी नोटीसमध्ये म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com