Jalgaon Ghodbander fort work inspection
Jalgaon Ghodbander fort work inspectionjalgaon reporter

घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार...

या सुशोभीकरणाचे लोकार्पण नवीन वर्षात राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती प्रताप सारणी यांनी दिली.

विरार : अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या घोडबंदर किल्ल्याच्या संवर्धनाचे, सुशोभीकरणाचे काम शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु आहे. गेल्या काही महिन्यात 'कोरोना'मुळे हे सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरु होते. आज आमदार सरनाईक व पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी किल्ल्यात सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावर याचवर्षी ३१ डिसेंबरपूर्वी किल्ला सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही पालिका आयुक्तांनी दिलीय.

नवीन वर्षात घोडबंदर किल्ल्याचे नवीन रूप आपल्याला पाहायला मिळेल, या सुशोभीकरणाचे लोकार्पण नवीन वर्षात महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे, अशी माहिती प्रताप सारणी यांनी दिली. घोडबंदर किल्ल्याचे संवर्धन व या परिसराचे सुशोभीकरण व्हावे, म्हणून आमदार प्रताप सरनाईक हे आमदार झाल्या दिवसापासून प्रयत्न करत आहेत.

Jalgaon Ghodbander fort work inspection
आम्ही केवळ आश्वासने देत नाही; तर दिलेला शब्द ही पाळतोच : उदयनराजे भोसले

त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन हा किल्ला राज्य संरक्षित किल्ला म्हणून 'महाराष्ट्र वैभव- राज्य संरक्षित स्मारक योजने' अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेस संगोपनार्थ देण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आवश्यक विविध परवानग्या , जिल्हा नियोजन समितीकडून कामासाठी निधी मिळवून किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते. काम प्रगतीपथावर असतानाच कोरोनाच्या संकटामुळे काही कामे रखडली आहेत.

Jalgaon Ghodbander fort work inspection
काश्मीरमधील हिंसेच्या वेळी अमित शहा गरबा खेळत होते ; कॉग्रेसचा घणाघात

घोडबंदर किल्ल्यात सुरु असलेले सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आयुक्तांनी कामाची पाहणी करावी, अशी विनंती आमदार सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार आज आमदार सरनाईक, आयुक्त दिलीप ढोले, पालिकेचे अधिकारी यांनी कामाची पाहणी केली. घोडबंदर किल्ल्यात सुरु असलेल्या प्रत्येक कामाची बारकाईने माहिती घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com