परमबीरसिंह अडचणीत...खंडणीच्या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारीसोबत सहआरोपी

माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्या विरोधात मुंबई, ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यानंतर आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परमबीरसिंह अडचणीत...खंडणीच्या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारीसोबत सहआरोपी
thane police registers another case of extortion against parambir singh

ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह  (Parambir Singh) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात केतन तन्ना यांच्यासह सोनू जलान आणि रियाज भाटी यांच्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात गँगस्टर रवी पुजारी (Ravi Pujari) हासुद्धा आरोपी आहे. त्यामुळे परमबीरसिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

परमबीरसिंह यांच्यावर आतापर्यंत मुंबईत एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. केतन तन्ना यांच्यासह सोनू जलान आणि रियाज भाटी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार ठाणे पोलिसांनी तिघांचा 30 जुलैला जवाब नोंदवून परमबीरसिंह यांच्यासह २८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

यामध्ये आठ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश असून त्यामध्ये तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे, एसीपी एन. टी. कदम, तसेच दोन पोलीस शिपायांच्या समवेश आहे. तसेच गँगस्टर रवी पुजारी याचेदेखील नाव यात आहे. त्यांच्या विरोधात जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारख्या दहांहून अधिक कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी यांच्यासह आठ जणांविरोधात आधी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात शरद अग्रवाल या व्यापाऱ्याकडून 4 कोटी 68 लाख रुपयांची खंडणी मागितली तसेच, जमीन जबरदस्तीने नावावर केल्याच्या आरोपावरुन परमबीरसिंह यांच्यासह तत्कालीन पोलीस उपयुक्त (गुन्हे) पराग मणेरे यांच्यासह संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पुनामिया हा परमबीरसिंह यांच्या जवळचा असल्याचे मानले जाते. खंडणी प्रकरणातील तक्रारदार अग्रवाल आणि आरोपी पुनमिया हे दोघे भागीदार होते. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी यावर्षी मार्च महिन्यात एक बैठक झाली होती. सुमारे साडेतीन चाललेली ही बैठक अग्रवाल यांनी टेप केली होती. तीच आता या तक्रारीचा आधार आहे. पुनामियाने त्यावेळी म्हटले होते की, ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. महाराष्ट्रातील मंत्र्याची विकेट पाडण्यास सांगितले असून, त्यानंतर केंद्रीय यंत्रणा मुंबईत येऊन तपास सुरू करतील. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in