Kalyan : तर त्यांनी गद्दाराची व्याख्या जाहीर करावी... विश्वनाथ भोईर

शिवसेना Shivsena संपवण्याचा राष्ट्रवादीचा NCP डाव होता, म्हणून आम्ही बाहेर पडलो, असेही आमदार भोईर Vishwanath Bhoir यांनी स्पष्ट केले.
MLA Vishwanath Bhoir
MLA Vishwanath Bhoirsarkarnama

मुंबई : महविकास आघाडीतून बाहेर पडलो याचा अर्थ आम्ही गद्दार नाही. मी शिवसैनिकच आहे. शिवसेना संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव होता, म्हणून आम्ही बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडून कोणत्या पक्षात विलीन झालेलो नाही. आम्हाला महाविकास आघाडी नको म्हणून महाविकास आघाडीतून बाहेर पडून जर गद्दार ठरवत असतील तर गद्दाराची व्याख्या काय ही त्या लोकांनी जाहीर करावी, असे आवाहन शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे.

शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झालेले कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आज पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले. यावेळी त्यांनी शिंदे सरकारच्या माध्यमातून शहरातील विकासकामे मार्गी लावण्यात येतील असे सांगितले.

MLA Vishwanath Bhoir
पंतप्रधान मोदींनीही एकनाथ शिंदेंचं 'ते' भाषण संपूर्ण ऐकलं अन् म्हणाले...

शहरप्रमुख मीच, राजीनाम्याचा प्रश्नच नाही....

शिंदे गटातील कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख आहेत. शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या शहर प्रमुख पदाबाबत चर्चा होती. याबाबत बोलताना आमदार भोईर यांनी शहर प्रमुख पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, मी अजूनही शिवसैनिक आहे. उद्धवजी पक्ष प्रमुख आहेत. त्यांनी माझी शहर प्रमुखपदी नियुक्ती केली होती. त्यांना पसंत असतील तर ते ठेवतील हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MLA Vishwanath Bhoir
हा केवळ भास आहे, यापूर्वी शिवसेना अशा अनेक संकटांतून बाहेर पडलेली आहे...

हा तर भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न

नवीमुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयाबाबत भोईर यांना विचारले असता, ते म्हणाले, नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो निर्णय आहे, तो मंत्रिमंडळात होईल. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या बैठकीत नामांतरण वैध की अवैध हे सुद्धा अजून ठरलेलं नाही. मात्र, दि. बा. पाटलांच्या नावाबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नक्की आग्रह धरू. हा इथल्या भूमिपुत्रांचा भावनिक प्रश्न आहे आणि या भूमिपुत्रांचा आक्रोश आहे. त्यामुळे या प्रश्नाबद्दल मी मुख्यमंत्र्यांशी नक्की बोलणार आणि सकारात्मक उत्तर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in