ओबीसींच्या जागेवर शिवसेनेने दिला आदिवासी उमेदवार

पालघरमध्ये आदिवासीसाठी मोठ्याप्रमाणात आरक्षण असताना ओबीसींच्या जागेवर आदिवासी उमेदवार देऊन शिवसैनिकांचे मनोधैर्य खच्ची करत आहे, असा आरोप होऊ लागला आहे.
ओबीसींच्या जागेवर शिवसेनेने दिला आदिवासी उमेदवार
CM Udhav ThackeraySarkarnama

न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या १५ जगासाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत साऱ्याच पक्षांनी ओबीसींच्या जागेवर ओबीसी उमेदवारच देण्याचे जाहीर केले असताना राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने मात्र, खासदाराच्या मुलांसाठी ओबीसींच्या उमेदवारीला डावलल्याचे चित्र डहाणूमध्ये दिसत आहे.

जिल्हा परिषदेच्या वणई गटातून शिवसेनेचे विद्दमान सदस्य सुशील चुरी यांना यावेळी शिवसेनेने उमेदवारी नाकारली असून, खासदार राजेन्द्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी दिली आहे, त्यामुळे वणई गटातुन नितेश किशोर चुरी यांनी अपक्ष म्हणून उमेरवारी अर्ज भरला असल्याने शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अगोदरच पालघरमध्ये आदिवासीसाठी मोठ्याप्रमाणात आरक्षण असताना पुन्हा एकदा ओबीसींच्या जागेवर आदिवासी उमेदवार देऊन शिवसेना येथील शिवसैनिकांचे मनोधैर्य खची करत आहे, असा आरोप आता सेनेतूनच होऊ लागला आहे.

CM Udhav Thackeray
'अजूनही वेळ गेली नाही, 'या' फॉर्म्युल्यावर भाजप-शिवसेना युती शक्य'

मुळात राजेंद्र गावित हे ज्यावेळी पालघरमध्ये आले तेव्हा त्यांनाही उपरा ठरविले होते. परंतु त्यानंतरही ते प्रथम काँग्रेस, नंतर भाजप आणि आता शिवसेनेतून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या मुलाला ही याठिकाणी येथील लोक सामावून घेतील असे सांगण्यात येते. गावित यांच्या मुलाकडे भावी खासदारकीचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्याला आता पासूनच राजकारणात उतरविण्याची योजना शिवसेनेने आखल्याचे बोलले जात आहे. आता ज्यांनी डहाणूत शिवसेना उभी केली ते शिवसैनिक निवडणुकीत काय करतात यावर निवडणुकीत हार जीतचा फैसला होणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in