शिवसैनिकांकडून शरयू नदीचे पवित्र जल शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अर्पण - Shivsainiks from Virar Returned from Ayodhya | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसैनिकांकडून शरयू नदीचे पवित्र जल शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अर्पण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 ऑगस्ट 2020

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर शिवसेना संघटक व पालिकेचे नगरसेवक विक्रम प्रताप सिंह हे शिवसेनेच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी अयोध्येला गेले होते. तिथे त्यांनी आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती शरयू नदीत साधु-संतांच्या उपस्थितीत विसर्जित केली, तसेच त्या ठिकाणी ४९२ दिवे प्रज्वलित केले.

विरार : मीरा-भाईंदरमधील काही शिवसैनिक अयोध्येला श्री राम मंदिर भूमिपूजनाच्या दिवशी गेले होते. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती मुंबईतून अयोध्येला नेली होती व अयोध्या येथे शरयू नदीत ही माती विसर्जित करण्यात आली. अयोध्येहून आज मुंबईत परत आलेल्या शिवसैनिकांनी स्मृतिस्थळी जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले, तसेच मंत्रोच्चाराच्या जयघोषात शरयू नदीचे पवित्र जल शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळी अर्पण केले.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर शिवसेना संघटक व पालिकेचे नगरसेवक विक्रम प्रताप सिंह हे शिवसेनेच्या वतीने ५ ऑगस्ट रोजी अयोध्येला गेले होते. तिथे त्यांनी आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती शरयू नदीत साधु-संतांच्या उपस्थितीत विसर्जित केली, तसेच त्या ठिकाणी ४९२ दिवे प्रज्वलित केले. ४९२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिर निर्माण होत असल्याने तेवढे दिवे लावण्यात आले.

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन
विक्रम प्रताप यांनी अयोध्येहून परत येताना सोबत रुद्राक्षाच्या माळा, 'जय श्रीराम' लिहिलेली शाल आणि शरयू नदीचे पवित्र पाणी मुंबईत आणले होते. मुंबईत आल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी या शिवसैनिकांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. पवित्र शरयू नदीचे जल विक्रमसिंग हे एका कलशातून मुंबईत घेऊन आले होते. आज शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर त्या पवित्र पाण्याने मंत्रोच्चारांच्या जयघोषात अभिषेक करण्यात आला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते स्मृतिस्थळी या पवित्र जलाने अभिषेक केला गेला, तेव्हा सगळ्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. शरयू नदीच्या पवित्र जलाने बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिषेक करून श्री राम लिहिलेली शाल, रुद्राक्ष माळा, फुले या ठिकाणी अर्पण करण्यात आली.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख