ठाण्याच्या आनंदमठासमोर शिवसेनेचा जल्लोष!

Kedar Dighe : 'संकुचित मनाचे लोकांचे विचार हे संकुचित असतात.'
Kedar Dighe
Kedar Dighe Sarkarnama

ठाणे : दसरा मेळाव्यावरुन (Shivsena Dasara Melava) वाद पेटला होता. शिवसेनेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली. शिवसेनेला न्यायालयाने मेळाव्यासाठी परवानगी दिली. दरम्यान यावर शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

आजचा निर्णय ही आनंदाची भावना आहे. हा सत्याचा लढा होता, तत्वांचा लढा होता, त्या बाजूने न्यायालयाने निर्णय दिला. यंदाच्या शिवसेना दसरा मेळाव्याला गर्दीचा उच्चांक गाठला जाणार, अशी प्रतिक्रिया दिघे यांनी दिली.

यावेळी शिंदेगट आणि भाजपवर त्यांनी टीका केली. "संकुचित मनाचे लोकांचे विचार हे संकुचित असतात. त्यांच्याकडे बोलण्याशिवाय दुसरं काहीच नाही.त्यांची हार कशात आहे हे त्यांना कळालं आहे, असेही दिघे म्हणाले.

Kedar Dighe
अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरणं म्हणाले,..मी गंमतीनं म्हणालो...

यावेळी सण आणि उत्सवाचं राजकारण यावरही दिघे यांनी भाष्य केले. दहीहंडी असो, नवरात्र उत्सव असो, हा कोणत्या गटातटाचा विषय नाही. हा आनंद दिघे साहेबांचा उत्सव आहे. लोक केवळ श्रद्धेने या ठिकाणी येतात, कुठल्याही राजकारणाच्या भावनेने येत नाहीत, असे दिघे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com