पालघर जि.प., पं.स.साठी 60 टक्के मतदान; खासदार पुत्राच्या लढतीकडे लक्ष

महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आपले नशीब अजमावण्यासाठी वेगवेगळे लढत असले तरी शिवसेनेने मात्र, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
पालघर जि.प., पं.स.साठी 60 टक्के मतदान; खासदार पुत्राच्या लढतीकडे लक्ष
Palghar ZPfacebook

विरार : पालघर जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. महाविकास आघाडी राज्यावर सत्तेत आल्यानंतर जिल्हात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढत नसून सर्वच पक्ष आपले नशीब अजमावण्यासाठी वेगवेगळे लढत असले तरी शिवसेनेने मात्र, ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत खासदार पुत्र उभे असल्याने साऱ्यांचे लक्ष पालघरवर लागले आहे.

या निवडणुकीत सत्तेतील साऱ्याच पक्षाचे मंत्री ठाण मांडून बसल्याने निवडणुकीत रंग भरले गेल्याचे चित्र दिसत होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी 60 टक्के मतदान झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 14 जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर होणारी पालघर जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Palghar ZP
...तर रामदास आठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते!

या निवडणुकीत सारेच पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले असून एकमेकांची ताकद अजमावत आहेत. निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. सकाळी मतदानासाठी कमी गर्दी असली तरी 10 नंतर मात्र, बऱ्यापैकी गर्दी दिसून येत होती. या निवडणुकीत खासदारपुत्राने चांगलेच रंग भरल्याने डहाणू तालुक्यातील वणई गट स्थानिक विरुद्ध उपरा यामुळे चांगलाच गाजला आहे. निवडणुकीत कोण जिंकणार यावर पैजा लागू लागल्या आहेत. पालघर मधील नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गटासाठी भाजप आणि सेनेत सरळ लढत होत असून याठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते.

Palghar ZP
किरीट सोमय्या उद्या साताऱ्यात; अजित पवारांचे काय टेन्शन वाढवणार

या निवडणुकीत भाजप आणि मनसे जसे एकत्र आले तसेच शेवटच्या क्षणी वाडा तालुक्यातील गारगाव मतदारसंघात भाजपच्या करुणा वेखंडे यांनी शिवसेनेच्या नीलम पाटील यांना पाठिबा दिल्याने या ठिकाणचे चित्र बदलले आहे. गेल्यावेळी विक्रमगड मधील ओलांडे गटातून विजयी झालेले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या निलेश संभारे यांचे पद ओबीसी आरक्षणात गेल्याने यावेळी ते उभे राहिले नसले तरी या गटात राष्ट्रवादी ,भाजप आणि सेनेत जोरदार लढत अपेक्षित आहे याठिकाणी जवळपास 70 टक्के मतदान झाल्याने हि जागा राष्ठ्रवादि राखते कि सेना हे उद्या समजणार आहे. त्यामुळे उद्या सर्वपित्र अमावसेला कोणता पक्ष कोणाचे श्राद्ध घालतो ते समजणार आहे. या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार असल्याचा दावा साऱ्याच पक्षांनी केला आहे.

पालघर जिल्हा परिषदेसाठी झालेले मतदान 3. 30 वाजेपर्यंतचे

वसई 64. 67, पालघर 49 . 48, वाडा 47. 29, मोखाडा 49. 25, विक्रमगड 68. 09, डहाणू 50. 82, तलासरी 60. 15, जिल्ह्याची सरासरी 49 ,48.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in