नऊ तरुणींची सुटका : राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला व भाजपच्या मृणाल पेंडसे आमनेसामने - Najeeb Mulla of NCP and Mrinal Pendse of BJP criticizes each other on release of nine youth | Politics Marathi News - Sarkarnama

नऊ तरुणींची सुटका : राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला व भाजपच्या मृणाल पेंडसे आमनेसामने

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने बुधवारी सायंकाळी या तरुणींची सुटका केली मात्र, या संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्याची माहिती अद्याप वर्तकनगर पोलीस स्थानकाकडून देण्यात आलेली नाही.

ठाणे : येऊर येथून भाजपा पदाधिकाऱयांच्या सहकार्याने काही दिवसांपूर्वी नऊ इंजिनिअरिंग  तरुणीची सुटका करण्यात आली होती. पण डांबून ठेवलेल्या तरुणींची सुटका म्हणजे केवळ भाजपची स्टंटबाजी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. त्यामूळे तरुणींच्या सुटकेनंतर राजकीय धुरळा सुरु झाल्याचे दिसते आहे.

पाटोणापाडा या ठिकाणी मागील दहा दिवसापासून कोरना संदर्भात संशोधन व व्हेंटिलेटर तयार करण्याच्या आमिषाने एक सुपरवासी नावाच्या एनजीओने वैद्यकीय कामाच्या बहाण्याने काही इंजिनियर तरुणींना डांबून ठेवण्याचा आरोप करण्यात आला होता. उच्चशिक्षित असलेल्या आठ ते दहा तरुणींना या एनजीओने ऑनलाइन पोर्टल वरून मेडिकल रिसर्च करण्याच्या नावाखाली जॉब देण्याचे आमिष दाखवून ठाण्यात बोलावले होते, मात्र त्यांना कोणतेही काम न देता एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. ज्या खोलीत या तरुण राहत होत्या त्या ठिकाणी अनेक छुपे कॅमेरे लावण्यात आले होते.

याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने बुधवारी सायंकाळी या तरुणींची सुटका केली मात्र, या संस्थेवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवण्याची माहिती अद्याप वर्तकनगर पोलीस स्थानकाकडून देण्यात आलेली नाही.

येऊर येथे काम करणाऱ्या या एनजीओच्या पदाधिकाऱयांचा महिला दिन व  होलिका उत्सव निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये भाजपाकडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला संस्थेचा सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेल्या गैरकृत्य बाबत पोलीस स्थानकात गुन्हा न नोंदवता स्टंटबाजी करायची ही भाजपची खेळी आहे असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केला.

यावरून नक्कीच वस्तुस्थिती काय आणि प्रसिद्धीसाठी केलेल्या स्टंटबाजी मुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून सदर प्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात यावी व संबंधित संस्थेच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.

याप्रकरणी तरुणींची सुटका करण्यासाठी पुढाकार घेणाऱया भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी सांगितले की, या संस्थेत यापूर्वी नैापाडा परीसरातील एक कार्यकर्तेी काम करीत होती. तिचा सत्कार करण्यात आला होता. पण या कार्यकर्तेीने या संस्थेबरोबर सहा महिन्यापासून कोणताही संबध ठेवलेला नाही. तसेच मूळात ही संस्था काही चुकीचे करीत असल्यानेच भाजपाने तिच्या विरोधात आवाज उठविला आहे. त्यामूळे या संस्थेच्या सर्वच कारभाराची चैाकशी झाली पाहिजे अशी आमचीही मागणी आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख