Dombivali : मनसेची बॅनर बाजीतून शिवसेनेवर बोचरी टीका... 'आता कसं वाटतंय...'

मनसेची ताकद Strength of MNS काय असते हे शक्तीप्रदर्शन show of force करून आम्ही दाखवू असं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील MLA Raju Patil म्हणाले आहेत.
Banners In Dombivali
Banners In Dombivalisarkarnama

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा महासंवाद दौरा सुरू आहे. शनिवारी कल्याण डोंबिवलीमध्ये राजपूत्र अमित यांचे आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीत चौका चौकात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. काही बॅनर वर "आता कसं वाटतंय, बरं बरं वाटतंय... कारण पेराल तेच उगवणार" असे लिहिले असून हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवसेनेवर ही बोचरी टीका करण्यात आली आहे.

राजपुत्र अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी तसेच कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद दाखवण्यासाठी मनसे कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बॅनरबाजी करत मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत. या बॅनरवर अमित ठाकरे यांचा फोटो असून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोटो देखील झळकले आहेत. तर काही बॅनरवर "आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय कारण पेराल तेच उगवणार" अशी टीका शिवसेनेवर या बॅनरच्या माध्यमातून केली आहे.

Banners In Dombivali
Thane : मनसे जिल्हाध्यक्षाने आदित्य ठाकरेंना डिवचले; देर आये, दुरूस्त आये...

मनसेची ताकद काय असते हे शक्तीप्रदर्शन करून आम्ही दाखवू असं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले आहेत. तर दुसरीकडे नागरिक देखील आनंद व्यक्त करत आहेत. अशा भेटीगाठी प्रत्येक नेत्यांनी केली पाहिजे. सध्या राज्यात राजकीय वातावरण तापत आहे. त्यात फक्त राजकीय घडामोडी सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये मनस्ताप निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी कोणताही पक्ष समोर येत नाही किंवा चर्चा करत नाही विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या जात नाहीत. अमित यांनी महासंपर्क संवाद दौरा सुरू केला असल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in