Thane : मनसे जिल्हाध्यक्षाने आदित्य ठाकरेंना डिवचले; देर आये, दुरूस्त आये...

अमित ठाकरे Amit Thackeray युवकांशी संवाद Communication with youth साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यामुळे आमचा नेता उत्तम काम करतोय याचा आम्हाला अभिमान आहे.
Avinash Jadhav, Aditya Thackeray
Avinash Jadhav, Aditya Thackeraysarkarnama

ठाणे : आदित्य ठाकरेंच्या पालघर, ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरून मनसेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांना डिवचले आहे. कार्यकर्त्यांचे सौभाग्य आहेत, त्यांचा नेता त्यांच्या दारात येतोय, आधी दारात जाऊनही भेटत नव्हते. देर आये, दुरूस्त आये.. त्यांनी कार्यकर्त्यांना भेटावे व वेळ द्यावा हीच अपेक्षा, असेही त्यांनी नमुद केले.

सध्या मनसेचे युवा नेते अमित ठाकरे व शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे ठाणे, पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावरून ठाणे, पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्क्ष अविनाश जाधव यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला आहे. तर अमित ठाकरे यांचे कौतूक केले आहे.

Avinash Jadhav, Aditya Thackeray
अमित ठाकरे मैदानात; राज्यभर मनविसे पुनर्बांधणी 'महासंपर्क' अभियान राबवणार

याविषयी विचारले असता मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले, दुसऱ्या पक्षाचा नेता काय करतोय याचं आम्हाला देणं घेणं नाही. पण आमचा नेता तरूणांना भेटतोय, हे महत्वाचे आहे. नुकताच त्यांचा कोकण दौरा झाला. अनेक ठिकाणची कॉलेजचे शिक्षण पूर्ण केलेली हजारो मुले त्यांना भेटत आहेत. तसेच ती मनसेत सामीलही होत आहेत. अमित ठाकरे या युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यामुळे आमचा नेता उत्तम काम करतोय याचा आम्हाला अभिमान आहे, अशा शब्दात अविनाश जाधव यांनी अमित ठाकरे यांच्या दौऱ्याचे कौतूक केले.

Avinash Jadhav, Aditya Thackeray
दरेकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावले : तेव्हा संवाद केला असता तर वादच निर्माण झाला नसता

तर आदित्य ठाकरेंच्या भेटीगाठीवर बोलताना श्री. जाधव म्हणाले, हे कार्यकर्त्यांचे सौभाग्य आहे. त्यांचा नेता त्यांच्या दारात येतोय. आधी दारात जाऊन ही ते भेटत नव्हते. देर आये, दुरूस्त आये. त्यांनी कार्यकर्त्यांना भेटावे, वेळ द्यावा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. नेता भेटावा व त्याच्या सोबत एखादा फोटो घ्यावा. त्यांच्या मोठ्या अपेक्षा नसतात. पण, ज्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात ते लाथ मारून पळून जातात. मुळात कार्यकर्त्यांमध्ये राहणारा नेता असणे गरजचे आहे.

Avinash Jadhav, Aditya Thackeray
भुमरे, शिरसाटांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे देणार धडक ; शिवसंवादातून शक्तीप्रदर्शन..

आमचा नेता कार्यकर्त्यांत राहणारा आहे. अमित ठाकरेंच्या दौऱ्यामुळे आमच्या पदाधिकारी व विद्यार्थी सेनेतही उत्साह आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे येथील एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा राहणार, याविषयी विचारले असता ते म्हणाले, ठाण्याचा मुख्यमंत्री झाला याचा आनंद आहे. त्यांनी पदभार स्वीकारून दहा दिवस झाले आहेत. त्यांच्याकडून आताच मोठ्या अपेक्षा बाळगणे योग्य नाही.

Avinash Jadhav, Aditya Thackeray
`मनविसे` म्हणते आमच्याकडे फक्त रिझल्ट असतो...

जे मागच्या २५ वर्षे महापालिकेत जे झाले तेच पुढे झाले तर लोकांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. मुख्यमंत्री ठाण्याचा आहे, लोकांच्या खूप अपेक्षा आहे. पण येथील क्लस्टर योजना १५ वर्षे उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे, ठाण्याला धरण मिळेल, बोटॅनिकल गार्डन मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आम्ही त्यावरही बोलूच, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com