मलंगगड लोडशेडिंग : शिवसेनेने अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात पेटवल्या मेणबत्या

रात्रीची अघोषित लोडशेडिंग Load Shending बंद झाली नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे नेते shivsena महेश गायकवाड Mahesh Gaikawad यांनी दिला.
Shivsena Andolan
Shivsena Andolansarkarnama

कल्याण : कल्याण जवळील मलंगगड परिसरात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अघोषित लोडशेडिंग सुरू करण्यात आलं आहे. याविरोधात आज शिवसेनेनं कल्याणच्या तेजश्री या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता. शिवसेनेच्या नेतृत्त्वात निघालेल्या या मोर्चात मलंगगड परिसरातील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. तर महिलांनीही मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

शिवसेनेचे स्थानिक नेते आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड, चैनू जाधव, राहुल पाटील, युवराज पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र, यावेळी पाटील यांच्या दालनातील लाईट, एसी, पंखे बंद करून त्यांच्याशी अंधारात चर्चा करण्यात आली.

Shivsena Andolan
वीज वितरण कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे येऊन बसतात तेव्हा...

तसेच त्यांना लोडशेडिंगच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या दालनात शिवसेनेनं मेणबत्त्या पेटवत लोडशेडिंगचा प्रतिकात्मक निषेध केला. यानंतर जर रात्रीची अघोषित लोडशेडिंग बंद झाली नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा  महेश गायकवाड यांनी दिला. तर लोडशेडिंग बंद न झाल्यास महावितरणच्या सर्व अधिकाऱ्यांना एक रात्र मलंगगड भागात मुक्कामाला घेऊन जाऊ, असा इशारा चैनू जाधव यांनी दिला.दरम्यान सत्ताधारी शिवसेनेनेच मोर्चा काढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com