महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधीही झुकणार नाही ; सुळेंनी ठणकावलं
supriya sulesarkarnama

महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधीही झुकणार नाही ; सुळेंनी ठणकावलं

'पवार कुटुंबाला टार्गेट केलं जातंय असं आपल्याला वाटतं का,' असा प्रश्न सुप्रिया सुळे (supriya sule) यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक, मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरुन आयकर विभागाची टीम छापेमारी करीत आहे. कालपासून ही कारवाई सुरु आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. ठाण्यात एका कार्यक्रमानंतर सुळे माध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''अजितदादा (ajit pawar) आणि आम्ही वेगळे नाही. आमचं कुटुंब एकच आहे आणि संघर्ष ही पवार कुटुंबाची खासियत आहे. दिल्लीनं कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढं कधी झुकला नाही आणि यापुढंही झुकणार नाही.''

''आमच्यावर भारतीय संस्कृती तसेच यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत, सत्तेत असतानाही आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नाही आणि करणार ही नाही.संघर्ष करणं हीच पवारांची खासियत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 'पवार कुटुंबाला टार्गेट केलं जातंय असं आपल्याला वाटतं का,' असा प्रश्न सुप्रिया सुळे (supriya sule) यांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

supriya sule
वानखेडे हे परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्याच कॅटेगरीतील अधिकारी

पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार म्हणाले, ''कालच्या बद्दल मी सांगितलेलं आहे. सारखं सारखं मी सांगायची गरज नाही. एकदा ती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. ढगात गोळ्या मारू नका. जे असेल ते दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल.'' ''कुठलाही प्रसंग असला तरी मी उत्तरं देतो, पाहुणे वेगवेगळ्या घरात आहे, त्यांचं काम चालू आहे, पाहुणे गेल्यानंतर मला जे बोलायचं आहे ते बोलेन, पाहुणे वेगवेगळ्या कार्यालयात आहे, नियमाने जे असेल ते जनतेसमोर येईल त्यात घाबरायचे काय कारण आहे,'' असे अजित पवार म्हणाले.

अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने छापा टाकला आहे. पार्थ पवार यांच्या मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याचे समजते. अजित पवार (ajit pawar) यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर आणि संचालकांच्या घरांवर आयकर विभागाने काल छापे टाकले. यानंतर अजित पवार यांनी सांगितले,''सत्तेचा गैरवापर आम्ही कधी केला नाही, पण माझ्या नातेवाईकांवरच का कारवाई केली, याचे वाईट वाटतं,''

Related Stories

No stories found.